Mumbai-Goa Expressway : लय भारी! आता मुंबई-गोवा अंतर फक्त 7 तासांत होणार पूर्ण, उभा राहतोय सागरी किनाऱ्यावरून जाणारा महामार्ग…

Ahmednagarlive24 office
Published:
mumbai goa highway

Mumbai-Goa Expressway : राज्यातून गोव्याला जाणारा महामार्ग हा अतिशय खराब झाला असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र लवकरच राज्य सरकारकडून मुंबई-गोवा महामार्ग तयार केला जाणार आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबई ते गोवा हे अंतर फक्त ७ तासांत कापता येणार आहे.

मुंबई ते गोवा हे अंतर 590 किलोमीटर आहे. सध्याच्या महामार्गावरून गोव्याला जायचे म्हंटले तर १२ तासांचा कालावधी लागत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोवा हा ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे तयार करण्याची योजना सरकारकडून आखली गेली आहे.

गोवा ते मुंबई हा महामार्ग २०१६ मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. तसेच हा प्रकल्प २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हा प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. काही अडचणींमुळे हा प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकला नाही.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्ग सागरी किवाऱ्यावरून बांधण्याची घोषणा केली आहे. हा प्रकल्प लवकरच सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.

सरकारकडून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वाढती संख्या आणि सध्याच्या महामार्गाची दुर्दशा लक्षात घेता नवीन महामार्ग बनवण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. सरकारकडून समुद्रकिनारी नवीन द्रुतगती मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने काम केले जात आहे.

कोकणातील समुद्र किनार्‍यावरून तयार करण्यात येणार्‍या चौपदरी कोस्टल ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वेवरून मुंबई ते गोवा हे अंतर सात ते आठ तासांत पार करता येणार आहे.

हा द्रुतगती मार्ग कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या सागरी किनाऱ्यावरून जाणार आहे. सिंधुदुर्गकडे जाणारा कोस्टल रोड आधीच कोकणात अस्तित्वात आहे, जो कमी रुंदीचा आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची योजना आहे.

केंद्र सरकारच्या मुंबई आणि कन्याकुमारी महामार्गाच्या कॉरिडॉरचा एक भाग म्हणून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. कोकणात जलद वाहतूक व्हावी तसेच पर्यटनाला चालना मिळवावी या उद्देशाने कोस्टल एक्सप्रेस वे बांधण्याची योजना सरकारकडून आखण्यात आली आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोकणाला खूप महत्व दिले जाते. कोकणामध्ये 500 ​​किमी पेक्षा जास्त समुद्र किनारा आहे. त्यामुळेच मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ग्रीन फिल्ड द्रुतगती मार्ग उभारला जाणार आहे.

सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. हे काम एकूण ११ टप्प्यांमध्ये होणार आहे. युनायटेड स्टेट्समधील लॉस एंजेलिस-सॅन फ्रान्सिस्को महामार्ग 1 च्या धर्तीवर हा मार्ग बांधण्याची अधिकाऱ्यांची योजना आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe