Scheme of Govt : भारत देशाला मोठा धार्मिक,सांस्कृतिक वारसा आहे. रामायण, महाभारत आदी पवित्र ग्रंथांचा अनमोल ठेवा आहे. यातील काही कथा पाहिल्या तर आजही त्याच्या खुणा दिसतात.
द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला व दुर्जनांचा संहार केला असे म्हटले जाते. भगवान श्रीकृष्णांनी वसवलेली द्वारका नगरी नंतर समुद्रात बुडवली असल्याचे म्हटले जाते.

आता या हजारो वर्षांपासून समुद्रात बुडालेल्या द्वारका नगरीचे दर्शन तुम्हा आम्हाला सर्वाना समुद्रात जाऊन घेता येणार आहे. ऐकून आश्चर्य वाटले असेल पण हे आता सत्यात उतरणार आहे.
गुजरात सरकार या मुख्य द्वारका दर्शनासाठी अरबी समुद्रात ‘प्रवासी पाणबुडी’ सेवा सुरू करणार आहे.
सरकारची मोठी तयारी
समुद्रातील मुख्य द्वारका दर्शनासाठी शासनाने तयारी सुरु केली आहे. यासाठी भारत सरकारची कंपनी माझगाव डॉक शिपयार्ड सोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केला आहे. जानेवारीत याबाबत घोषणा होऊ शकते.
या स्वदेशी फाणबुडीचे संचलन माझगाव डॉक करेल. जन्माष्टमी किंवा दीपावलीपर्यंत ही सेवा सुरू होईल. ही प्रवासी पाणबुडी समुद्रात ३०० फूट खोल जाईल. या रोमांचक सफरीसाठी दोन ते अडीच तास लागू शकतात.
याचे भाडे जास्त असेल पण राज्य सरकार अनुदानासारखी व्यवस्था करू शकते अशी माहिती राज्य पर्यटन विभागाचे प्रमुख सचिव हरित शुक्ला यांनी दिलीये.
द्वारकेचे दर्शन घडवणारी पाणबुडी ‘अशी’ असेल
पाणबुडीचे वजन ३५ टन असून ती वातानुकूलित असेल. यामध्ये साधणार ३० लोक बसू शकतात. यात दोन रांगेत २४ प्रवासी, दोन चालक, २ मानवी पाणबुडे, एक गाईड व एक तंत्रज्ञ असेल. सोबत मेडिकल किटही असेल.
प्रत्येक आसनाला खिडकी असेल जेणेकरून सागर तळातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येईल. प्रवाशांना ऑक्सिजन मास्क, फेस मास्क व स्कूबा ड्रेस संचलन करणारी संस्था असेल, त्यांचे भाडे तिकिटात समाविष्ट असणार आहे. पाणबुडीत बसूनही समोर स्क्रिनवर अंतर्गत हालचाली, सागरी जीव इत्यादी पाहता येणार आहे.













