Upcoming SUV Cars in India : मारुतीसह या कंपन्यांच्या SUV कारची भारतात होणार ग्रँड एन्ट्री, जाणून घ्या सविस्तर…

Ahmednagarlive24 office
Published:

Upcoming SUV Cars in India : भारतीय ऑटो क्षेत्रात आणखी नवीन SUV कार लॉन्च होणार आहेत. जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय बाजारात मारुतीसह अनेक इतर कंपन्यांच्या SUV कार लॉन्च होणार आहेत.

मारुती सुझुकी नवीन एसयूव्ही

भारतीय ऑटो क्षेत्रात मारुती सुझुकी कंपनीकडून लवकरच भारतात तीन नवीन SUV कार लॉन्च केल्या जाणार आहेत. या तीनही SUV कार ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. २ SUV कारची प्री-बुकिंग सुरु आहे तर लवकरच तिसऱ्या SUV कारची बुकिंग उपलब्ध होणार आहे.

मारुतीच्या या SUV चे बुकिंग सुरु

मारुतीने आगामी फ्रँक्स आणि जिमनीसाठी बुकिंग सुरू केले आहे. कंपनीने ऑटो एक्सपो 2023 मध्येच या दोन्ही एसयूव्ही सादर केल्या होत्या. ऑफ रोडिंगसाठी चांगला पर्याय म्हणून जिमनीचे वर्णन केले जात आहे.

तर फ्रंटमध्ये अत्याधुनिक फीचर्सचा दावा करण्यात आला आहे. या दोन्हीचे बुकिंग भारतात सुरू झाले आहे. 15 ते 20 हजार रुपयांच्या दरम्यान, दोन्ही एसयूव्ही बुकिंगसाठी उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकीकडून भारतात लवकरच नवीन SUV लॉन्च केली जाणार

मारुतीची ही नवीन SUV Brezza CNG लॉन्च केली जाऊ शकते. येत्या ३ ते ४ महिन्यांत भारतीय बाजारपेठेत Brezza ची नवीन आवृत्ती लॉन्च होऊ शकते.

टाटा मोटर्सची नवीन एसयूव्ही

टाटा मोटर्सकडून देखील अनेक नवनवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच आता टाटा मोटर्स देखील नवीन SUV भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. टाटाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही पंच सीएनजी आवृत्तीमध्ये सादर केली जाईल. ऑटो एक्सपो 2023 मध्ये त्याची ड्युअल सिलेंडर आवृत्ती देखील लॉन्च करण्यात आली होती.

Hyundai नवीन SUV

Hyundai भारतात आपली नवीन SUV सादर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कंपनी मायक्रो एसयूव्ही कॅस्पर सादर करू शकते. त्याची किंमत जवळपास 8 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. सध्या कारबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe