Traffic New Rule : १ मार्चपासून वाहतुकीचे नियम बदलले, या चुका केल्यास भरावा लागणार दंड; जाणून घ्या नवीन नियम

Ahmednagarlive24 office
Published:

Traffic New Rule : जर तुमच्याकडेही वाहन असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण आरटीओकडून वाहतुकीच्या नियमांमध्ये १ मार्चपासून बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही नवीन नियम जाणून घेतले नाहीत तर तुम्हालाही मोठा दंड होऊ शकतो.

वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्राइव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. जर तुम्ही विना लायसन्स वाहन चालवत असाल तर तुमच्याकडून दंड आकाराला जाऊ शकतो. तसेच तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते.

वाहतूक विभाग आरटीओकडून वाहतुकीच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. रस्ते अपघात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यामुळे आरटीओ सतत वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करत असते.

आरटीओचे नवीन नियम

आरटीओकडून संपूर्ण भारतामध्ये नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. 10 वर्षे जुनी डिझेल वाहने आणि 15 वर्षे जुनी पेट्रोल वाहने जप्त केली जातील असा नियम होता आणि या नियमाचा परिणाम 1 फेब्रुवारी 2023 पासून वेगाने दिसून आला.

आता सरकारने आणखी एक नियम आणला आहे ज्या अंतर्गत जुनी वाहने कोणतीही असो, त्यांची तारीख संपली आणि तुम्ही ती चालवताना आढळल्यास सरकार तुम्हाला मोठा दंड आकारेल.

सरकारकडून या नियमाची अंमलबजावणी केली जात आहे. जर तुमच्याकडेही १० किंवा १५ वर्षापूर्वीचे जुने वाहन असेल तर तुम्हालाही मोठा दंड होऊ शकतो. तसेच तुमचे वाहनही जप्त केले जाऊ शकते.

जर तुम्ही तुमच्या जुन्या वाहनात बदल केल्यास ते सरकारच्या नियमांविरुद्ध असू शकते. त्यामुळे सरकार तुमच्याकडून 10 ते 15000 रुपये दंड आकारू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वाहनाबाबत काळजी घेणे गरजचे आहे.

तुमच्या जुन्या वाहनावर केलेला दंड थेट तुमच्या बँक खात्यातून वजा केले जातील. इतकेच नाही, जर तुम्ही अधिक नियमांचे उल्लंघन केले तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील जप्त केले जाऊ शकते.

जर तुमचेही डिझेलवरील वाहन १० वर्षापेक्षा जास्त जुने असेल किंवा पेट्रोलवरील वाहन १५ वर्षापेक्षा जास्त असेल तर त्वरित ते वापरणे बंद करा. कारण अशी वाहने वापरणे तुमचा खिसा मोकळा करू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe