…तर संपूर्ण पृथ्वीवर पसरेल भयानक अंधार

India News : जगभरातील काही देशांच्या सत्ताधीशांना सध्या युद्धाची खुमखुमी चढली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करून युद्धाला तोंड फोडले आहे. हे युद्ध गेले दीड वर्षे सुरू आहे.

दुसरीकड़े उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंग जोंग ऊन एकापाठोपाठ एक अण्वस्त्रांच्या चाचण्या करून जगाला धमकावत आहे. त्यामुळे संपूर्ण जग सध्या युद्धाच्या छायेत आहे. ही तिसऱ्या जागतिक महायुद्धाची नांदी आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

तिसरे महायुद्ध जर झालेच तर त्यामध्ये अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, हे निश्चित. पण असे झाले तर अण्वस्त्रांच्या स्फोटांमुळे जे धूर आणि धुळीचे ढग उठतील, त्याने संपूर्ण पृथ्वी झाकोळली जाणार आहे.

धूर आणि धुळीच्या ढगांमुळे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे पृथ्वीचे तापमान अचानक शून्याच्या खाली जाईल. असे झाल्यास पृथ्वीवर कोणताही जीव जिवंत राहू शकणार नाही, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

जगाच्या आजवरच्या इतिहासामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे जपानची हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे. अमेरिकेने या शहरांवर सर्वप्रथम अणुबॉम्ब फेकला. ज्याचे भीषण परिणाम जपानमधील कित्येक पिढ्यांना भोगावे लागले.

आण्विक शस्त्रांच्या संहारक क्षमतेचे ते एक ज्वलंत उदाहरण बनून राहिले आहे. त्याची जर पुनरावृत्ती झाली तर ती अधिक भयावह असेल, अशी भीती जगभरातील शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe