Ganesh Jayanti 2023 : येणाऱ्या गणेश जयंतीला आहेत हे ३ शुभ मुहूर्त; जाणून घ्या तारीख आणि कधी आहे शुभमुहूर्त

Ahmednagarlive24 office
Published:

Ganesh Jayanti 2023 : येणाऱ्या नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंतीला ३ शुभ मुहूर्त आहेत. त्या शुभमुहूर्तावर तुम्ही पूजा पाठ करू शकता. गणेशजींची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतील.

हिंदू धर्मात गणेशजींना खूप मानले जाते. तसेच कोणतीही पूजा करत असताना पहिल्यांदा गणेशजींचे नाव घेऊन ती सुरु केली जाते. तसेच गणेशजींचे भक्त वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गणेशजींच्या मंदिरात जाऊन पूजापाठ करत असतात.

गणेश जयंती दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र गणेशाची पूजा केली जाते. या गणेश जयंतीला खास शुभमुहूर्त तयार झाले आहेत. यावेळी गणेशजींची पूजा करणे शुभ मानले जाते.

कधी आहे गणेश जयंती?

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 24 जानेवारी 2023 मंगळवार दुपारी 3.22 ते 25 जानेवारी 2023 बुधवार दुपारी 12.34 पर्यंत असेल. अशा स्थितीत उदयतिथीनुसार यंदा गणेश जयंती २५ जानेवारीला साजरी होणार आहे.

शुभ वेळ

यंदाच्या गणेश जयंतीदिवशी पूजेचा शुभ मुहूर्त २५ जानेवारी रोजी सकाळी ११.२९ ते दुपारी १२.३४ पर्यंत असेल. तुम्हाला सांगतो की जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी चंद्र पाहू नये. यामुळे कलंक पाठीमागे लागतो असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.

शुभ योग

रवि योग – 25 जानेवारी सकाळी 7:13 ते रात्री 8:50 पर्यंत
शिवयोग – 25 जानेवारी सकाळी 8.5 ते रात्री 11.10 पर्यंत
परीघ योग – 25 जानेवारी सकाळी ते संध्याकाळी 6.16 पर्यंत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe