Optical Illusion : सोशल मीडियावर मनात भ्रम तयार करणारे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच लोकही अशा चित्रांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. ऑप्टिकल इल्युजनचे चित्र समजून घेण्यासाठी तुम्हाला काही वेळ द्यावा लागेल.
ऑप्टिकल इल्युजन चित्रातील कोडे सोडवताना तुमच्या मनात गोंधळ निर्माण होईल. मात्र तुम्हाला शांत आणि बारीक नजरेने चित्रातील बॉल शोधून काढायचा आहे. बॉल शोधण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.
तुमच्याकडे बॉल शोधण्यासाठी काही सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे. त्यामध्ये जर तुम्ही बॉल शोधला तर तुम्ही जिनियस असाल. अनेकजण हा बॉल शोधण्यात अपयशी झाले आहेत.
आजच्या चित्रात बॉल शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. चित्रात तुम्हाला अनेक व्यक्ती समुद्रकिनारी दिसतील. प्रत्येकजण वेगवेगळ्या कामामध्ये गुंतलेले आहेत. त्यामधून तुम्हाला बॉल शोधून काढायचा आहे.
ऑप्टिकल इल्युजनची चित्र सोडवल्याने मेंदूचा व्यायाम होतो असे म्हंटले जाते. तसेच निरीक्षण करण्याची क्षमताही वाढते. चित्रातील कोडे सहजासहजी सापडणे कठीण आहे. मात्र तुम्हाला यासाठी प्रयत्न करावा लागेल.
चित्रात समुद्रकिनारी रंगीबेरंगी छत्र्या दिसत आहेत. तसेच एक मुलगा बॉल खेळताना कुठेतरी गायब झाला आहे. तसेच काहीजण वाळूमध्ये खेळत आहेत. तर इतर अनेकजण व्यस्त दिसत आहेत.
तुम्ही या चित्रातील कोडे सोडवण्यात अपयशी झाला असाल तर काळजी करू नका खालील चित्रांमध्ये तुम्हाला बॉल दिसेल. मात्र त्याआधी तुम्ही चित्रातील कोडे सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा.