World Greatest Place : दरवर्षी जगातील सर्वोत्तम ठिकाणांची यादी टाईम मासिकातर्फे जाहीर केली जाते. यंदाही २०२३ ची जगातील सर्वोत्तम ठिकाणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील २ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. लडाख आणि मयूरभंजने ५० नावांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यात आली आहेत.
या ठिकाणांची यादी जाहीर करत त्यांची प्रोफाइल पेजही मॅगझिनने शेअर करण्यात आली आहेत. या ठिकाणी दुर्मिळ वाघ, प्राचीन मंदिरे, साहसी आणि उत्तम खाद्यपदार्थांसाठी निवडण्यात आली असून त्यांच्या प्रोफाइलमध्ये ५० नावांच्या यादीत त्यांचा समावेश करण्याचे कारण दिले आहे.
ही आहेत जगातील भारतातील २ सर्वोत्तम ठिकाणे
लडाख
दरवर्षीं अनेकजण लडाख या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असतात. तसेच लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि बाईक चालवण्याचा आनंद घेत असतात. याच ठिकाणाचे नाव टाइम मॅगझिनने आपल्या यादीत समाविष्ट केले आहे.
लडाखमध्ये अनेक अशी दृश्य पाहायला मिळतात जी अनेकांनी कुठेही पाहिलेली नसतील. तसेच तिबेटी संस्कृतीमुळे जगभरातील पर्यटक या ठिकाणी आकर्षित होत असतात.
लडाखमध्ये अशा काही जागा आहेत तिथले सौंदर्य पर्यटकांच्या मनात घर करून जातात. या ठिकाणी अनेक सौंदर्य ठिकाणे आहेत जी पाहण्यासाठी लाखो पर्यटक लडाख या पर्यटन स्थळी भेट देत असतात.
2023 मध्ये, भारताने लडाखची राजधानी लेहपासून 168 किमी अंतरावर असलेल्या हानले गावात पहिले गडद आकाश राखीव बनवले आहे. हे असे ठिकाण आहे जिथे एका वर्षात सुमारे 270 स्वच्छ रात्री असतात, जे खगोलीय घटनांसाठी एक आदर्श ठिकाण आहे.
लडाखमध्ये पोहोचल्यावर, जेव्हा तुम्हाला बर्फाचे पर्वत दूरवर पसरलेले दिसतील, तेव्हा एक रोमांचक नैसर्गिक दृश्य तयार होते जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल. याशिवाय येथे मिळणारे खाद्यपदार्थही तुम्हाला अधिक आकर्षित करतील. येथे तुम्ही ट्रेकिंग आणि बाइकिंगसारख्या रायडींगचा आनंद घेऊ शकता.
मयूरभंज
हे एक असे ठिकाण आहे ज्याठिकाणी तुम्हाला दुर्मिळ वाघ पाहायला मिळतील. तसेच प्राचीन मंदिरे आणि सांस्कृतिक वारसा यामुळे मयूरभंज हे जगातील दुर्मिळ ठिकाणांच्या यादीत समावेश करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्वाधिक काळे वाघ पाहायला मिळतात.
सिमलीपाल नॅशनल पार्क व्यतिरिक्त, या जिल्ह्यात इतर अनेक ठिकाणे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. हिरवेगार नैसर्गिक दृश्य किंवा पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या प्राचीन मंदिरांबद्दल जाणून घेऊया…
सिमलीपाल नॅशनल पार्क हे या ठिकाणचे सर्वाधिक प्रसिद्ध स्थळ आहे. या पार्कमध्ये दररोज फक्त 60 वाहनांना जाण्याची परवानगी आहे. या ठिकाणी तुम्हाला काळे वाघ, आयल बंगाल वाघ आणि 40 हून अधिक सस्तन प्राण्यांच्या प्रजाती पाहायला मिळतील.
या ठिकाणी देखील दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणचे नृत्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक या पर्यटन स्थळाला भेट देत असतात. तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर याठिकाणी जाऊ शकता.
टाईम मॅगझिनने लडाख आणि मयूरभंज या दोन्ही ठिकाणांचा जगातील आकर्षक ठिकाणांच्या यादीत समावेश केला आहे. तुम्ही आजपर्यंत भारतातील दोन सुंदर ठिकाणांना भेट दिली नसेल, तर तुम्ही येथे अवश्य भेट द्या.