Chanakya Niti : हे लोक नेहमी यशात आणतात अडथळे, वाईट काळात अशा लोकांना मागू नका मदत, अन्यथा…

Ahmednagarlive24 office
Published:

Chanakya Niti : चाणक्यनीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनात सफल होण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. त्या मार्गांचा अवलंब केल्याने माणूस एक दिवस नक्की यशस्वी होईल. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये स्त्री आणि पुरुषांबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत.

वाईट प्रसंगात माणसाने नेहमी शांत डोक्याने निर्णय घेतले पाहिजेत. संयम ठेऊन कोणतेही कार्य केले पाहिजे. तसेच काही लोकांकडून कधीही वाईट काळात मदत घेऊ नये अन्यथा तुम्ही आणखी अडचणीत येऊ शकता असे चाणक्य म्हणतात.

आयुष्यात कधी ना कधी दुःखाचा सामना करावा लागेल. तसेच कधी ना कधी आयुष्यात आनंद देखील येईल. मात्र दुःखाच्या वेळी कधीही अशा लोकांना मदत मागू नये जे शत्रू पेक्षा कमी नसतात. ते आणखी अडथळा निर्माण करू शकतात.

मतलबी व्यक्ती

चाणक्य यांच्या मते नेहमी मतलबी व्यक्तीपासून दूर राहावे. असे लोक इतरांचा विचार न करता फक्त स्वतःचा विचार करतात. अशा लोकांकडून कधीही मदतीची अपेक्षा ठेऊ नये. असे लोक सदैव स्वार्थ पाहत असतात.

ईर्ष्यावान व्यक्ती

संकटाच्या काळात ईर्ष्यावान असणाऱ्या व्यक्तीपाशी कधीही मदत मागू नका. असे लोक कधीही इतरांना मदत करत नाही. असे लोक सतत दुसऱ्यांशी स्पर्धा करत असतात. वाईट काळात तुमची फसवणूक करून त्यांचा फायदा करून घेऊ शकतात.

अधार्मिक व्यक्ती

चाणक्यांच्या मते अधार्मिक व्यक्तीपासून चार हात लांब राहिले पाहिजे. कारण असा व्यक्ती वाईट कृत्य करत असतो. त्यामुळे कधीही संकटाच्या काळात अशा लोकांना मदत मागू नका अन्यथा तुम्ही आणखी अडचणीत येऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe