Black Hair Tips : पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय ठरत आहेत या गोष्टी, नैसर्गिकरित्या काळे होतील केस…

Ahmednagarlive24 office
Published:

Black Hair Tips : बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार आजच्या तरुण पिढीला आजाराचे निमंत्रण देत आहे. त्यामुळे कमी वयात गंभीर आजराला सामोरे जावे लागत आहे. तसेच कमी वयात केस पांढरे होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.

आजकाल २० ते २५ वयोगटातील तरुणांचे केस पांढरे होत असल्याने त्यांना केस कलर करावे लागत आहेत. जर नैसर्गिकरित्या केस काळे करायचे असतील तर काही गोष्टींनी हे शक्य आहे.

घरबसल्या तुम्ही नैसर्गिकरित्या काळे केस करू शकता. तुम्हाला केस काळे करण्यासाठी सर्व वस्तू घरीच सापडतील. त्या वस्तूंचा वापर करून तुम्ही काळे केस सहजरित्या करू शकता.

केस काळे करण्यासाठी खालील गोष्टींचा वापर करा

1. ब्लॅक टी

केस काळे करण्यासाठी तुम्हाला ब्लॅक टीचा देखील उपयोग होऊ शकतो. ब्लॅक टीमध्ये ते अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असतात, जे केस काळे करण्यास मदत करतात. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात २ चमचे काळ्या चहा आणि एक चमचा मीठ घालून उकळा. आता ते गाळून घ्या, हे पाणी थंड झाल्यावर केसांना लावा.

2. कांद्याचा रस आणि ऑलिव्ह ऑइल

डोक्यावरील पांढरे केस कमी करण्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर मानला जातो. हे केसांच्या वाढीसाठी देखील उपयुक्त आहे. ऑलिव्ह ऑइलमध्ये कांद्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळून टाळूची मालिश करा. यामुळे केस मजबूत होतील आणि पांढऱ्या केसांपासून मुक्तता मिळेल.

3. आले आणि मध

आले आणि मध एकत्र करून केसांना लावल्याने अनेक फायदे होतात. याचे मिश्रण केस काळे करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आले किसून त्यात मध मिसळा. आता ही पेस्ट केसांना लावा. साधारण अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा. ही प्रक्रिया आठवड्यातून किमान दोनदा करा.

4. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस

तुम्ही दररोज खोबरे तेल केसांना लावत असाल. मात्र नुसते खोबरे तेल लावून केस काळे होणार नाहीत. त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा. याचा नियमित वापर केल्यास केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe