Electric Car : टाटाच्या Tiago EV ला टक्कर देण्यासाठी बाजारात आली ही स्वस्त इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये धावणार 320KM

Ahmednagarlive24 office
Published:

Electric Car : टाटा कंपनीच्या कार ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. तसेच टाटा कंपनीच्या गाड्यांची किंमतही कमी असल्याने ग्राहकांना घेणे ते परवडत आहे. मात्र आता टाटा कंपनीकडून इलेक्ट्रिक कार बनवण्यावर अधिक भर दिला जात आहे. आता टाटा कंपनीच्या इलेक्ट्रिक कारला टक्कर देण्यासाठी बाजारात दुसऱ्या कंपनीची इलेक्ट्रिक कार दाखल झाली आहे.

टाटा मोटर्सकडून सर्वात कमी किमतीमध्ये Tata Tiago EV कार ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कारची किंमत 8.49 लाख ते 11.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून Tata Tiago EV ला ओळखले जात आहे.

Tata Tiago EV ही सिंगल चार्जमध्ये 315KM धावते. मात्र याच कारला टक्कर देण्यासाठी फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने देखील इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. Citroen eC3 असे या इलेक्ट्रिक कारचे नाव आहे.

ही कार सिंगल चार्जमध्ये 320KM धावेल. तसेच या कारचे बुकिंग देखील सुरु झाले आहे. 25,000 रुपये भरून ग्राहक कंपनीच्या वेबसाइट वरून ही कार प्री बुक करू शकतात.

बॅटरी आणि रेंज

ही कार सिंगल चार्जमध्ये 320KM रेंज देत आहे. कारमध्ये 29.2kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कारमधील इंजिन 57bhp पॉवर आणि 143Nm टॉर्क जनरेट करते.

Citroen eC3 ही कार 6.8 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडू शकते. १०७ प्रतितास ही कार धावू शकेल. या कारमध्ये दमदार आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

वैशिष्ट्ये

ही कार दोन व्हेरियंटमध्ये कंपनीकडून सादर करण्यात आली आहे. नवीन Citroen eC3 च्या टॉप व्हेरियंटमध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह 10.2-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, उंची समायोजित करण्यायोग्य ड्रायव्हर सीट, चार-स्पीकर ऑडिओ सिस्टम, कनेक्टेड कार टेक यांचा समावेश आहे. सुरक्षिततेसाठी, ड्युअल एअरबॅग्ज, EBD (इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स वितरण) सह ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) उपलब्ध आहेत.

चार्जिंग पर्याय

या इलेक्ट्रिक कारमध्ये २ चार्जिंग पर्याय देण्यात आले आहेत. DC फास्ट चार्जर आणि 3.3kW ऑनबोर्ड AC चार्जर. फास्ट चार्जरने 57 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येतो.

कारची पूर्ण बॅटरी चार्जिंग होण्यासाठी 10.5 तास लागतात. कंपनी बॅटरी पॅकवर 7 वर्षे/1,40,000 किमी वॉरंटी, इलेक्ट्रिक मोटरवर 5 वर्षे/1,00,000 किमी वॉरंटी आणि वाहनावर 3 वर्षे/1,25,000 किमी वॉरंटी देत ​​आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe