Upcoming SUV Car : मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार बाजारात धुमाकूळ घालत आहेत. तसेच सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार म्हणून मारुती सुझुकी कंपनीची ओळख आहे. मारुती सुझुकीची बलेनो कार सध्या सर्वाधिक विकली जात आहे.
मात्र आता मारुतीच्या बलेनो कारला टक्कर देण्यासाठी बाजारात नवीन SUV कार येणार आहे. मारुती कंपनीनेच ऑटो एक्सपोमध्ये एक नवीन SUV कार सादर केली आहे. फ्रॉन्क्स असे या SUV कारला नाव देण्यात आले आहे.
नवीन SUV कारला दोन इंजिन पर्याय
मारुतीकडून फ्रॉन्क्स कारला दोन इंजिन पर्याय दिले जाणार आहेत. पहिले इंजिन 1.0-लिटर बूस्टरजेट टर्बो पेट्रोल असेल, जे 100 PS आणि 147.6 Nm पीक पॉवर आउटपुट तयार करेल. कारमधील दुसरे इंजिन 1.2L K-Series पेट्रोल इंजिन असेल, जे 88 PS आणि 113 Nm जनरेट करेल.
वैशिष्ट्ये
फ्रॉन्क्स कार ही मारुती सुझुकीची नवीन SUV कार असेल. त्यामध्ये नवीन केबिन आणि वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. 9-इंच स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 40+ इंटेलिजेंट कनेक्टेड कार वैशिष्ट्ये आणि 6-स्पीकर मिळतात.
कारमध्ये सुरक्षिततेसाठी, धमाकेदार 6 एअरबॅग, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, ऑटो IRVM, हिल होल्ड असिस्ट आणि सर्व सीटवर 3-पॉइंट ELR सीट बेल्ट आहेत.
बलेनोला देणार टक्कर
या SUV कारचे डिझाईन पाहिल्यास तुम्हाला सेम बलेनो सारखेच दिसेल. तसेच या नवीन कारमध्ये SUV Grand Vitara ची देखील काही वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. बलेनोला फक्त एका इंजिन पर्यायासह ऑफर केले जाते, तर फ्रॉन्क्सला दोन इंजिन पर्याय मिळतात. त्यामुळे बलेनोला टक्कर मिळू शकते.