Electric Bike : भारतीय बाजारपेठेत ही इलेक्ट्रिक बाईक 110 किमी रेंजसह गाजवतेय वर्चस्व, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Published on -

Electric Bike : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक आणि कार उपलब्ध झाली आहेत. असेच काही इलेक्ट्रिक बाईक लोकप्रिय देखील झाल्या आहेत. तसेच दररोज नवनवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत.

भारतीय बाजारपेठेत अशी एक इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाली आहे ज्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिंगल चार्जमध्ये ही बाईक ११० किमीची रेंज देत आहे. तसेच या बाईकमध्ये भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.

Kridn Electric Bike

ज्या इलेक्ट्रिक बाईकबद्दल सांगत आहोत तिचे नाव Kridn इलेक्ट्रिक बाईक आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच ही इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाली आहे. तसेच या बाईकला ग्राहकही प्रचंड प्रतिसाद देत आहेत.

सिंगल चार्ज केल्यानंतर ही बाईक 110 किमी पेक्षा जास्त रेंज देते असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. या बाईकमध्ये कंपनीकडून 3 kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ज्यासोबत 5500 वॅटची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड आणि ब्रेक

या बाईकचे टॉप स्पीड ताशी 95km देण्यात आले आहे. कंपनीकडून टॉप स्पीड जबरदस्त देण्यात आल्याने अनेकजण या बाईकला चांगला प्रतिसाद देत आहे. बाईकमध्ये पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक बाइकची किंमत आणि EMI

सध्या बाजारात अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमतीही खुच जास्त आहेत. One Electric कंपनीने ही इलेक्ट्रिक बाईक कमी किमतीमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

1.35 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीमध्ये ही बाईक ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच खरेदी करताना या बाईकसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. तुम्हाला कंपनीकडून EMI चा पर्याय देखील बघायला मिळेल. ज्यामध्ये तुम्ही 4,070 रुपये सहज EMI भरून इलेक्ट्रिक बाईक खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News