मोदींचा या वर्षीची पहिलाच विदेश दौरा, या देशांसाठी झाले रवाना

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 PM Narendra Modi, :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांचा या वर्षातील हा पहिलाच दौरा असून, तीन दिवसांच्या तीन देशांच्या या दौऱ्यादरम्यान ६५ तासांच्या कालावधीत ते २५ कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत.

रशिया- युक्रेन युद्ध आणि त्यानंतर रशियाविरोधात बहुतांश युरोपीय देशांची एकजूट या पार्श्वभूमीवर मोदी यांचा युरोप दौरा महत्वाचा ठरत आहे. पंतप्रधान आज २ मे रोजी बर्लिनला भेट देणार आहेत.

यावेळी ते शॉल्ज यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर डेन्मार्कचे पंतप्रधान मॅटे फ्रेडरिक्सन यांच्या आमंत्रणावरून द्विपक्षीय चर्चेसाठी ३ व ४ मे रोजी कोपनहेगनचा दौरा करणार आहोत.

यावेळी दुसऱ्या भारतीय-नॉर्डिक शिखर संमेलनातही ते भाग घेणार आहेत. आपल्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ते काही वेळ फ्रान्समध्ये थांबून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe