General Knowledge : मंडळी भारतातील सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य कोणते ? काय झालं, गोंधळात पडलात का ? पण चिंता नको, आज आपण अवघे दोन जिल्हे असणाऱ्या पूर्ण राज्याची माहिती पाहणार आहोत.
खरेतर, आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात राज्यात आणखी काही नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे. कारण म्हणजे आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधील क्षेत्रफळ हे अधिक आहे, यामुळे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या नागरिकाला जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

आणि जिल्ह्याच्या ठिकाणी काही काम असेल तर शेवटच्या टोकावर वसलेल्या नागरिकाला एका दिवसात ते काम पूर्ण करता येत नाही. यामुळे येत्या काही दिवसांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन होणार असे म्हटले जात आहे. मात्र भारतात असे एक राज्य आहे जिथे फक्त दोन जिल्हे आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे हे राज्य आपल्याच महाराष्ट्राच्या बॉर्डरला आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील बॉर्डरला हे राज्य लागते.
यावरून आता तुम्हाला समजलं असेल की आम्ही कोणत्या राज्याबाबत बोलतोय. होय आम्ही बोलतोय ते राज्य आहे तुमच्या मनातलं गोवा. मंडळी गोवा हे महाराष्ट्रातील सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य आहे गोव्यात फक्त दोन जिल्हे आहेत. मात्र दोन जिल्हे असले तरी देखील जगभरातील पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी गर्दी करतात.
गोव्याला लाभलेलं नैसर्गिक सौंदर्य हे शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. शिवाय या ठिकाणी असणारे विस्तृत समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात येथील नाईट लाईफ देखील अगदीच दर्शनीय आणि पर्यटकांना भुरळ घालणारी आहे. हेच कारण आहे की भारतातील कानाकोपऱ्यातील पर्यटक गोव्याला एन्जॉय करण्यासाठी येतात फक्त भारतातीलच नाही तर जगातील इतर देशांमधील पर्यटक सुद्धा गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. फार पूर्वीपासूनच गोवा हे एक हॉट फेवरेट टूरिस्ट डेस्टिनेशन राहिलेले आहे.
गोवा हे आपल्या देशातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे राज्य आहे. लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे देशातील चौथे छोटे राज्य आहे. हे राज्य भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला आपलं महाराष्ट्र म्हणजे आपल्या राज्याच्या दक्षिणेला हे राज्य स्थित आहे.
गोव्याच्या पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र आहे. गोव्यात दोन जिल्हे आहेत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. उत्तर गोवा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र पणजी आहे आणि दक्षिण गोवा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र मडगाव आहे. उत्तर गोव्याचे क्षेत्रफळ कमी आहे मात्र इथे लोकसंख्या जास्त आहे आणि उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्याचे क्षेत्रफळ जास्त आहे मात्र येथे लोकसंख्या उत्तर गोव्याच्या तुलनेत कमी आहे.
आता आपण गोव्यातील काही प्रमुख पिकनिक स्पॉट ची माहिती जाणून घेणार आहोत. गोव्यातील प्रमुख पिकनिक स्पॉट रेईस मॅगस किल्ला, कोल्वा बीच, अरामबोल बीच, बागा बीच, अंजुना बीच, दूध सागर धबधबा, बटरफ्लाय बीच ही गोव्यातील काही प्रमुख पिकनिक स्पॉट आहेत. याव्यतिरिक्त गोव्यात चर्च अन मंदिरे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि इथेही पर्यटकांची नेहमीच गर्दी होते. गोव्यातील नैसर्गिक सौंदर्य, अथांग समुद्रकिनारा, बीचेस, समुद्रकिनाऱ्यावर असणारी पर्यटकांची गर्दी सारच काही उल्लेखनीय आहे. यामुळे पर्यटकांचे पाय आपसूक गोव्याकडे खेचले जातात.