Mahashivratri Special:- महाशिवरात्री हा आध्यात्मिक आणि धर्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा दिवस असून या दिवशी संपूर्ण देशामध्ये मोठ्या मनोभावाने श्री. भगवान शिव शंकरांची पूजा देशात सर्वत्र केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी देशातील प्रत्येक महादेव मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होते.
एवढेच नाही तर अनेक भाविक देशातील अनेक ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरांना भेटी देतात व दर्शनाचा लाभ घेत असतात. यावर्षी आठ मार्चला म्हणजेच परवा महाशिवरात्री येत असून संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार यात शंकाच नाही. जर तुमचा देखील या महाशिवरात्रीला भगवान शिव शंकराचे दर्शन करायची इच्छा असेल तर या लेखामध्ये आपण भारतातील काही अशा मंदिरांची माहिती घेणार आहोत ज्या ठिकाणी महादेवाच्या सर्वात मोठ्या आकाराच्या मूर्ती आहेत.

भारतात या ठिकाणी आहेत महादेवाच्या सर्वात मोठ्या मूर्ती
1- कैलासनाथ महादेव मूर्ती– सांगा हे एक नेपाळमधील गाव असून ते भारतीय सीमेजवळ आहे व या ठिकाणी कैलाशनाथ महादेवाची मूर्ती आहे. त्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचा रंग सोनेरी असून ही नेपाळमधील सांगा या ठिकाणी आहे.
सांगा इथे असणाऱ्या महादेवाच्या मंदिराला कैलासनाथ महादेव मंदिर असे म्हटले जाते. महादेवाची ही भव्य मूर्ती असून तिची उंची 45 मीटर म्हणजेच 143 फुटाच्या आसपास आहे. भगवान श्री महादेवांची ही मूर्ती तुम्ही अगदी नेपाळमधून देखील पाहू शकतात.
2- आदियोगी शिव मूर्ती– भगवान महादेवांची ही भव्य आदियोगी स्वरूपातील मूर्ती तामिळनाडू राज्यातील कोईमतुर येथे आहे. भगवान महादेवांच्या या भव्य मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील समाविष्ट करण्यात आलेले आहे.
त्या मूर्तीच्या आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे महादेवाच्या चेहऱ्याच्या आकारात असलेली ही शिवाची एकमेव मूर्ती असून 122 फूट उंचीची व पाचशे टन वजनाची ही मूर्ती आहे. या मूर्तीचे बांधकाम 24 फेब्रुवारी 2017 मध्ये पूर्ण झाले. या ठिकाणी देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटक देखील दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
3- हरिद्वार येथील महादेवाची मूर्ती– भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये असलेले हरिद्वार या शहरामध्ये महादेवाची ही मोठी मूर्ती असून ती हरिद्वार येथे हर कि पौडीच्या गंगा घाटावर असून त्या मूर्तीची उंची तब्बल 100 फुटी इतकी आहे. तुम्ही अगदी लांब उभे राहून देखील या मूर्तीचे आरामात दर्शन घेऊ शकतात. हरिद्वार हे ठिकाण देशातील भगवान शिव शंकराच्या भव्य मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.