अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- आयपीएलचा यंदाचा हंगाम चांगलाच रंगला. कोरोनाच्या गर्तेत उशिरा सुरु झालेला आणि प्रेक्षकांविना अनेक नियमांत खेळाला गेलेला हा हंगाम आता शेवटच्या टप्प्याकडे आला आहे.
आता प्ले-ऑफचं होणार असून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बँगलोर या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. यंदाच्या मोसमातल्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. मुंबईने 14 पैकी 9 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.
तर दिल्लीच्या टीमने 14 पैकी 8 मॅच जिंकल्या आणि 6 मॅच हरल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. हैदराबाद, बँगलोर आणि कोलकाता या तिन्ही टीमनी 7 पैकी 7 सामने जिंकले, पण नेट रनरेटमुळे या टीम तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिल्या.
कोन जाणार फायनलला ? :- पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्यामुळे मुंबई आणि दिल्लीचा फायदा होणार आहे. कारण प्ले-ऑफच्या मॅचमध्ये पराभव झाला, तरी त्यांना फायनलला पोहोचण्याची दुसरी संधी मिळणार आहे.
प्ले-ऑफमध्ये मुंबईचा सामना दिल्लीशी होणार आहे, या मॅचमध्ये विजयी झालेली टीम फायनल गाठेल, तर हैदराबादची लढत बँगलोरशी होईल.
हैदराबाद आणि बँगलोर यांच्यात पराभूत झालेल्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल, तर जिंकलेली टीम मुंबई आणि दिल्ली यांच्यात पराभूत झालेल्या टीमसोबत खेळेल. या सामन्यात विजय मिळवलेली टीम फायनलला पोहोचेल.
वेळापत्रक
- 5 नोव्हेंबर- मुंबई विरुद्ध दिल्ली- क्वालिफायर-1, दुबई
- 6 नोव्हेंबर- हैदराबाद विरुद्ध बँगलोर- एलिमिनेटर, अबु धाबी
- 8 नोव्हेंबर- क्वालिफायर-2, अबु धाबी
- 10 नोव्हेंबर- फायनल, दुबई
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved