Tips and Tricks For Credit Card : क्रेडिट कार्डधारकांनो तुम्हीही करत असाल या ५ चुका तर सावधान! होऊ शकते नुकसान….

Ahmednagarlive24 office
Published:

Tips and Tricks For Credit Card : आजच्या आधुनिक युगाच्या काळात सर्वकाही ऑनलाईन होऊ लागले आहे. मग ते शॉपिंग, शिक्षण आणि बँकिंग सर्वकाही ऑनलाईन पद्धतीने झाले आहे. देशात सर्वकाही कॅशलेस होऊ लागले आहे. त्यामुळे सर्वजण आता ऑनलाईन आर्थिक व्यवहार करत आहेत.

क्रेडिट कार्डधारक छोटे छोटे पेमेंट करत असताना त्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. पण अनेकवेळा तुमची फसवणूक केली जाऊ शकते. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ५ चुकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

1. क्रेडिट कार्ड वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे

तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर अनेक ठिकाणी काळजी घेणे गरजेचे आहे. देशात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तुम्हीही त्याला बाली पडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्डवरून पेमेंट करत असताना अनेकजण कार्ड स्वाईप केल्यानंतर नंबर आणि रक्कम टाकतात. टर्म आणि कंडिशन न वाचता अनेकजण पेमेंट करत असतात. या टर्म आणि कंडिशन पूर्णपणे वाचा आणि त्यांणातच पेमेंटसाठी परवानगी द्या.

2. क्रेडिट कार्डसह संपर्करहित व्यवहाराचे तोटे

आजकाल दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये बदल होत चालले आहेत. तुम्ही विना स्वाईप करता क्रेडिट कार्डवरून पैसे काढल्याचे पाहिले असेल. हो आता कार्ड स्वाईप न करता तुम्ही पेमेंट करू शकता.

पण ही प्रणाली तुमच्यासाठी धोक्याची ठरू शकते. क्रेडिट कार्डचा पिन न टाकता पेमेंट करता येणाऱ्या प्रणालीमुळे फसवणूक केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशी प्रणाली वापरणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते.

3. क्रेडिट कार्ड व्यवहार मर्यादा सेट करा

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर व्यवहार मर्यादा सेट करू शकता. पण बँकेकडून अनेकदा तुम्हाला त्याचे लिमिट वाढवण्यासाठी कॉल किंवा मेसेज येत असतो. या कॉल किंवा मेसेजकडे तुम्हीही दुर्लक्ष करा. तुमचे लिमिट कमी असेल तर तुमची मोठी फसवणूक टळू शकते.

4. क्रेडिट कार्डवरून होणारे आंतरराष्ट्रीय व्यवहार थांबवा

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात क्रेडिट कार्डचा वापर केला जात आहे. तुम्ही परदेशात प्रवास करत नसल्यास आंतरराष्ट्रीय व्यवहार अक्षम करा. किंबहुना, आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना फसवणुकीची अधिक प्रकरणे आढळतात. अनेक वेळा लोक OTP शिवायही अगदी सहज व्यवहार करतात. आंतरराष्ट्रीय शॉपिंग वेबसाइट्सना भेट देताना सावधगिरी बाळगणे देखील खूप महत्वाचे आहे.

5. रोख रकमेसाठी क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या

क्रेडिट कार्डने हे फक्त ऑनलाईन शॉपिंग किंवा पेमेंटसाठीच नाही तर जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा एटीएममधून पैसे काढले जातात. पण जर तुम्ही असे केल्यास तुम्हाला एटीएममधून काढलेल्या पैशावर व्याज द्यावे लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe