Tips to Reduce AC Bill : मस्तच! आता कडक उन्हातही चालावा फुल एसी, तरीही वीजबिल येणार कमी, फक्त फॉलो करा या 5 टिप्स

Ahmednagarlive24 office
Published:

Tips to Reduce AC Bill : देशातील अनेक भागात सध्या उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. काही राज्यांमध्ये ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अनेकजण सतत एसीचा वापर करत असतात.

सतत एसीचा वापर केल्याने वीजबिल देखील जास्त येत असते. त्यामुळे अनेकजण एसीचा वापर टाळतात. मात्र आता तुम्ही सतत एसीचा वापर केला तरीही तुम्हाला वीजबिल जास्त येणार नाही. त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वात प्रथम हे करा

जर तुम्ही घरामध्ये एसीचा वापर करत असाल तर तुम्हाला घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद कराव्या लागतील. असे केल्याने खोलीतील वातावरण थंड होईला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे याचा परिणाम तुमच्या वीजबिलावरही दिसून येईल.

टाइमर वैशिष्ट्य वापरा

सर्व एसीमध्ये टाइमर वैशिष्ट्य असते. त्यामुळे रात्रभर एसी चालवण्याऐवजी तुम्ही टाइमर सेट करून खोली थंड झाली की एसी बंद करू शकता. त्यामुळे तुमचे वीजबिल देखील कमी होईल.

एसी पॉवर स्विच ऑफ ठेवा

बर्‍याच घरांमध्ये असे दिसून येते की इलेक्ट्रिक सामान नीट बंद केले जात नाही, म्हणजे रिमोटवरून एसी बंद होतो, पण एसीचा पॉवर स्वीच चालूच राहतो. अशा स्थितीत त्याचा थेट परिणाम वीज बिलावर होतो आणि विजेचा वापर वाढतो. त्यामुळे एसीचा पॉवर स्वीच बंद करावा.

एसी योग्य तापमानात चालवा

एसी कधीही किमान 16 अंश तापमानात चालवू नये. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी म्हणजेच BEE नुसार, साधारणपणे मानवांसाठी योग्य तापमान २४ अंश असते. अशा स्थितीत या तापमानात एसी चालवून विजेबरोबरच पैशांचीही बचत होऊ शकते.

AC सर्व्हिसिंग वेळोवेळी करून घ्या

जर तुमच्याही घरात एसी असेल तर तुम्ही देखील वेळोवेळी त्याची सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. कारण अनेकदा त्याची सर्व्हिसिंग न केल्याने एसीच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे विजेचा वापर देखील होत असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe