Chanakya Niti : सुखी जीवन जगण्यासाठी या लोकांपासून नेहमी राहा दूर, अन्यथा आयुष्यभर भोगावे लागेल…

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना प्रचीन इतिहासात राजकारण आणि मुत्सद्देगिरीचे तत्वज्ञानी मानले जात असत. आचार्य चाणक्य हे हुशार आणि महान अर्थशास्त्रज्ञ होते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती हा ग्रंथ लिहला आहे. यामध्ये त्यांनी मानवाच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितली आहेत.

आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनाबद्दल, सुखी संसार आणि यशस्वी कसे होईचे याबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. त्याचा आजही मानवाला आयुष्यात उपयोग होत आहे.

माणसाने जीवन जगात असताना काही लोकांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे. अन्यथा सुखी संसार बरबाद होईल जास्त वेळ लागणार नाही. तसेच आयुष्यात अडचणीही कमी येतील असे चाणक्य यांनी सांगितले आहे.

1. दुष्टांच्या गावात राहणे

आचार्य चाणक्य यांच्या मते जर एखादा व्यक्ती इअतरण सतत दुखावत असेल तर त्याच्यापासून नेहमी दूर राहिले पाहिजे. असे लोक तुम्हाला अडचणीत आणू शकतात. जो व्यक्ती वाईट विचार करतो त्या व्यक्तीसोबत राहणे धोकादायक ठरू शकते.

2. मूर्ख मुलगा

जर तुम्हालाही मुलगा असेल आणि तो तुमचं ऐकत नसेल तर अशा मुलाचा तुमच्या जीवनात काहीही उपयोग नाही. अशी मुले नेहमी तुम्हाला त्रास देतील. म्हणून लवकरच तुम्ही त्याला समजावून सांगू शकता.

3. चुकीची बोलणारी बायको

वैवाहिक जीवनात सुखी संसार करायचा असेल तर तुम्हाला एकमेकांच्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. जर तुमची बायको सतत तुम्हाला वाईट बोलत असेल तर त्या व्यक्तीला कधीही सुख मिळत नाही. छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडण होत राहतात.

4. चुकीच्या लोकांची सेवा करणे

जे लोक समाजात नीट वागत नाहीत किंवा त्यांना समाजात योग्य स्थान नाही अशा लोकांची कधीही सेवा करू नका. तुम्ही केलेल्या सेवेची काहीही किंमत राहणार नाही. असे लोक तुम्ही केलेली सेवा विसरून जातील. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe