Share Market Tips : आज हे शेअर्स करतील मालामाल! तज्ज्ञांनी सांगितलेल्या शेअर्सवर गुंतवा पैसे; होईल फायदा

Published on -

Share Market Tips : गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट हा एक चांगला पर्याय आहे. मात्र यामध्ये जोखीम जास्त आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे अधिक मिळतील. मात्र पैसे जाण्याचा धोकाही जास्त आहे. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही पैसे गुंतवू शकता.

शेअर मार्केट हे एक असे साधन आहे ज्यामध्ये तुम्ही कमी वेळेत जास्त पैसे कमवू शकता. कोणतेही बँक किंवा सरकारी योजना जितका परतावा देत नाही तितके जास्त पैसे शेअर मार्केटमधून कमवता येऊ शकतात.

सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे अनेकांना आज बाजारात उसळी येईल असे वाटत आहे. तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सांगितले आहेत. त्यामध्ये पैसे गुंतवून कमाईची संधी आहे.

एंजेल वनचे तांत्रिक विश्लेषक राजेश भोंसले यांचे KNR कन्स्ट्रक्शन आणि विप्रोवर बाय रेटिंग आहे. KNR कन्स्ट्रक्शन Rs 262 चा स्टॉप लॉस आणि Rs 280 चे लक्ष्य ठेऊ शकता. त्याचप्रमाणे, विप्रोसाठी, तुम्ही रु.389 चा स्टॉप लॉस आणि रु.414 चे लक्ष्य ठेऊ शकता.

आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनीही विप्रो आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) च्या शेअर्सवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, तुम्ही रु. 382 चा स्टॉप लॉस ठेवू शकता आणि रु. 425 चे लक्ष्य ठेवू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही SAIL साठी रु.82 चा स्टॉप लॉस आणि रु.99 चे लक्ष्य ठेऊ शकता.

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया यांनी सांगितले की पॉवर ग्रिड आणि हिरो मोटोकॉर्प शेअर्सवर पैसे लावू शकतात. पॉवर ग्रिडसाठी, 212 रुपयांचा स्टॉप लॉस आणि 220 ते 225 रुपयांचे लक्ष्य ठेवले जाऊ शकते. त्याचप्रमाणे Hero MotoCorp साठी Rs 2,680 चा स्टॉप लॉस आणि Rs 2,850 ते 2,900 चे लक्ष्य ठेवता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe