Top 10 Highest Earner Players in IPL : देशातील सर्वात मोठा क्रिकेटचा रणसंग्राम IPL २००८ रोजी सुरु झाला आहे. आयपीएलचा पहिला हंगाम २००८ मध्ये खेळला गेला होता. ललित मोदी हे बीसीसीआयचे तत्कालीन उपाध्यक्ष होते ज्यांनी भारतात आयपीएलची सुरुवात केली आहे.
आता आयपीएल सुरु होऊन जवळपास १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आयपीएल जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग आहे. तसेच आयपीएल जागतिक खेळातील चौथी महागडी लीग बनली आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून अनेक खेळाडू आजही आयपीएल खेळत आहेत.
आयपीएलमध्ये दरवर्षी खेळाडूंना करोडो रुपये दिले जातात. या २०२३ च्या आयपीएल सिजनमध्ये सॅम कुरनला सर्वात जास्त बोली लावून खरेदी करण्यात आले आहे. पंजाब किंग्जने त्याला 18.5 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
10- दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिक हा आयपीएलमधील सर्वात जास्त कमाई करणारा खेळाडू आहे. त्याचा आयपीलमधून पैसे कमाईच्या बाबतीत १० वा क्रमांक लागतो. दिनेश कार्तिक सध्या आरसीबीमध्ये खेळत आहे. त्याने आयपीएलमधून आतापर्यंत एकूण 86.92 कोटी रुपये कमावले आहेत.
9- शिखर धवन
शिखर धवन हा आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये ९ व्या क्रमांकांवर येतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिखर धवनने आतापर्यंत आयपीएलमधून ९१.८ कोटी रुपये कमावले आहेत.
8- गौतम गंभीर
गौतम गंबीर सध्या क्रिकेट खेळात नाही. मात्र त्याने देखील आयपीएलमधून भरगच्च पैसे कमावले आहेत. 2008 मध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सने 2.9 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर 2011 मध्ये त्याला KKR ने 11.04 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने आतापर्यंत एकूण 94.62 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
7- एबी डिव्हिलियर्स
एबी डिव्हिलियर्सला जगातील ‘मिस्टर 360 डिग्री’ खेळाडूं म्हणून ओळखले जात होते. त्याने देखील क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०२१ मधील आयपीएलचा हंगाम हा त्याच्यासाठी शेवटचा हंगाम होता. त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेण्यापूर्वी 102.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
6- सुनील नरेन
सुनील नरेन याने आयपीएल खेळण्यास सुरुवात केल्यापासून तो केकेआरकडून खेळत आहे. २०१२ मध्ये त्याला केकेआर संघाने 3.51 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तसेच 2018 ते 2021 या काळात प्रति हंगाम 12.5 कोटी रुपये शुल्क आकारत होता. तसेच आता त्याने हीच रक्कम कमी करून 6 कोटी रुपये केली आहे. आतापर्यंत त्याने एकूण 107.2 कोटींची कमाई केली आहे.
5- रविंद्र जडेजा
रवींद्र जडेजा हा देखील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमधील ६ व्या क्रमांकावरील खेळाडू आहे. सुरुवातीला त्याला राजस्थान रॉयल्स’ने 12 लाख रुपयांना खरेदी केले होते. सध्या तो सीएसके संघाकडून खेळत आहे. सध्या तो १६ कोटी रुपये घेत आहे. आतापर्यंत त्याने आयपीएलमधून 109 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
4- सुरेश रैना
2008 मध्ये झालेल्या लिलावात ‘चेन्नई सुपर किंग्स’ने सुरेश रैनाला 2.6 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो अजूनही पाचव्या क्रमांकावर आहे. सुरेश रैनाने आयपीएलमधून एकूण 110 कोटी रुपये कमावले आहेत.
3- विराट कोहली
आयपीलमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली याने आयपीलमध्ये सर्वाधिक 7000 धावा केल्या आहेत. विराट कोहली आज 15 कोटी रुपये फी घेत आहे. त्याने आजपर्यंत एकूण 173.2 कोटी रुपये कमावले आहेत.
२- महेंद्रसिंग धोनी
महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहे. धोनी आयपीएलच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक 6 कोटी रुपये मानधन घेणारा खेळाडू होता. यानंतर त्याला 2011 मध्ये 8.28 कोटी रुपये, 2014 मध्ये 12.5 कोटी रुपये आणि 2018 मध्ये 15 कोटी रुपये मिळाले. तो सध्या 12 कोटी रुपये फी घेत आहे. महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधून आतापर्यंत १७६.८४ कोटी रुपये कमावले आहेत.
1- रोहित शर्मा
रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. रोहित आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहे. त्याला ‘डेक्कन चार्जर्स’ने पहिल्या सत्रात 3 कोटी रुपयांना विकत घेतले होते. ‘मुंबई इंडियन्स’ला कर्णधार म्हणून 5 वेळा चॅम्पियन बनवणारा रोहित सध्या 16 कोटी रुपये फी घेत आहे. त्याने आता आयपीएलमधून एकूण 178.6 कोटी रुपये कमावले आहेत.