अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत लोकांमध्ये समावेश आहे. तसेच ते आशियातील सर्वात श्रीमंत माणूस आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या यादीमध्ये असे काही लोक समाविष्ट आहेत कि ज्यांना मुकेश अंबानी यांचे डोळे आणि कान असे म्हटले जाते. डोळे आणि कान संबोधल्या जाणाऱ्या दोन व्यक्तींचे रिलायन्सशी संबंधित बऱ्याच पॉलिसी तयार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे.
हे दोन व्यक्ती म्हणजे मेसवानी बंधू आहेत. मेसवाणी बंधू रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे नातेवाईकही आहेत. हितल आर मेसवानी आणि निखिल आर मेसवानी हे मेसवानी बंधू म्हणून ओळखले जातात. हे दोन्ही भाऊ रसिकलाल मेसवानी यांचे पुत्र आहेत.
1990 मध्ये हितल मेसवानी रिलायन्समध्ये रुजू झाले. सध्या ते पेट्रोलियम रिफायनिंग आणि त्याचा मार्केटिंग बिजनेस, पेट्रोकेमिकल मॅन्युफॅक्चरिंग, एचआर, रिसर्च यासह अनेक कॉर्पोरेट विभागांची देखरेख करतो. हितलने अमेरिकेतील पेंसिलवेनियाच्या व्हार्टन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
तेथून इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी बॅचलर ऑफ सायन्स पदवी मिळविली. त्याच वेळी त्याचा भाऊ निखिल मेसवानी यांनी केमिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला होता. 1986 मध्ये तो रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक भाग झाला आणि दोन वर्षांनंतर त्यांना कंपनीचा कार्यकारी संचालक बनविण्यात आले. ते प्रामुख्याने पेट्रोकेमिकल विभागात काम करतात. 1997 ते 2005 या काळात त्यांनी कंपनीच्या रिफायनरी विभागाचे काम पाहिले आहे.
याशिवाय ते रिलायन्स ग्रुपशी संबंधित आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचे कामदेखील पाहतात. मेसवाणी बंधूंचे वडील रसिकलाल मेसवानी हे रिलायन्सच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. अलीकडेच अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की केवळ मेसवानी बंधूच कंपनीचे नवीन एमडी बनू शकतात.
मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्याव्यतिरिक्त मेसवाणी बंधूंसह 12 जण संचालक मंडळाचा भाग आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे अध्यक्ष असलेले अरुंधती भट्टाचार्य यांचा मुकेश अंबानी यांच्या सुपर टीममध्ये समावेश आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती 82 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|