Toyota Mini Fortuner : टोयोटा कंपनीची फॉर्च्युनर कार भारतामध्ये सर्वाधिक फेमस असलेली कार आहे. अनेकांचे फॉर्च्युनर खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र त्याची किंमत जास्त असल्याने अनेकांना फॉर्च्युनर खरेदी करता येत नाही. पण आता फॉर्च्युनरचे सर्व फीचर्स असलेली कार टोयोटोकडून सादर करण्यात आली आहे.
आता टोयोटो कंपनीकडून अर्बन क्रूझर हायराइडर कार फॉर्च्युनरच्या सर्व फीचर्ससह बाजारात आणली आहे. त्यामुळे आता तुम्ही फॉर्च्युनरचे सर्व फीचर्स असणारी अर्बन क्रूझर हायराइडर कार फक्त १० लाखात खरेदी करू शकता.
तुम्हाला टोयोटो फॉर्च्युनर कार खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही टोयोटाची अर्बन क्रूझर हायराइडर कार खरेदी करू शकता. या कारमध्ये तुम्हाला फॉर्च्युनरचे सर्वकाही फीचर्स पाहायला मिळतील.
अर्बन क्रूझर हायराइडरचे डिझाइन आणि स्वरूप
टोयोटोकडून या कारची लांबी 4365 मिमी ठेवण्यात आली आहे. तसेच कारचा लूकही फॉर्च्युनर कारसारखा देण्यात आला आहे. तसेच या कारमध्ये फ्लॅट बोनेटसह ट्विन एलईडी डीआरएल देण्यात आले आहे.
अर्बन क्रूझर हायराइडर कारमध्ये 17-इंच अलॉय व्हील्ससह 210mm चा ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहे. तसेच मागील बाजूस स्प्लिट टेललाइटसह C आकाराचा ब्रेक लाइट देण्यात आली आहे.
पॉवरट्रेन आणि अर्बन क्रूझर हायराइडरची वैशिष्ट्ये
अर्बन क्रूझर हायराइडर कारमध्ये 3 इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यात निओ ड्राइव्ह, सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक आणि ई-सीएनजी यांचा समावेश आहे. Hyryder ला एक मोठी 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते, जी Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. याशिवाय 360 डिग्री कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी Hyryder मध्ये बघायला मिळते.
किंमत आणि मायलेज
अर्बन क्रूझर हायराइडर कारच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.48 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारचे ४ मॉडेल कंपनीकडून सादर करण्यात आले आहेत. या कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 18.54 लाख रुपये आहे.
Hyryder 4 प्रकारांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या कारमध्ये फॉर्च्युनरसारखी जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली असल्याने ग्राहकांना देखील ही कार चांगलीच पसंत येत आहे. तसेच ही कार 19.39 kmpl ते 27.97 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे.