Trending News: संपूर्ण जगात आज पाळीव प्राणी म्हणून लोकांना कुत्रे पाळणे आवडते. आज जगातील काही लोकांना कुत्रे इतके आवडतात कि ते त्यांच्यासाठी घर देखील तयार करतात आणि त्या घरात अनेक सुविधा देखील उपलब्ध करू देतात. मात्र कधी तुम्ही कोणत्या कुत्र्याकडे तब्बल पाच कोटी रुपयांची संपत्ती आहे हे ऐकले आहे का ? नाही ना , आम्ही तुम्हाला सांगतो देशातील गुजरात या राज्यातील एका गावामध्ये काही कुत्रे आहे ते प्रत्यक्षात करोडपती आहेत. आज आम्ही या लेखात त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहोत. चला मग जाणून घ्या या पाठीमागचा अनेक कारण काय आहे.
भारतीय कुत्रे आहेत करोडपती
आम्ही तुम्हाला काही कुत्र्यांबद्दल सांगणार आहोत जे प्रत्यक्षात करोडपती आहेत. हे कुत्रे परदेशातील नसून आपल्याच देशातील आहेत, ज्यांच्या नावावर करोडोंची संपत्ती आहे. गुजरातमधील बनासकांठा येथील पालनपूर तालुक्यात दिसणारे कुत्रे इतके श्रीमंत आहेत की, त्यांचा कोणताच मेळ नाही. हा कुत्रा 1-2 नाही तर 5 कोटी रुपयांचा मालक आहे.
जाणून घ्या कारण
अनेक वर्षांपूर्वी जेव्हा राजेशाही होती तेव्हा येथे नवाबांची सत्ता असायची, मात्र एकेकाळी गावातील नवाबाने गावकऱ्यांना जमीन दिली होती आणि गावकऱ्यांनी कुत्र्यांना जमीन दिली होती. सध्या येथील कुत्र्यांकडे 20 बिघे जमीन आहे. आजच्या काळात या जमिनींची किंमत 5 कोटींहून अधिक आहे.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो अलीकडेच Netflix ने जाहीर केले आहे की ते जगातील सर्वात श्रीमंत कुत्र्यावर एक डॉक्युमेंट्री चित्रित करत आहे. काही काळापूर्वी एका बातमीने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते की जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा हा जर्मनीचा आहे जो जर्मन शेफर्ड जातीचा आहे. या कुत्र्याची एकूण संपत्ती 4100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मेस्सी, रोनाल्डो, अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुख खानसह जगातील अनेक बड्या सेलिब्रिटींकडेही एवढी संपत्ती नाही. मात्र हे जाणून घ्या कि ही बातमी फेक होती.
बातमीचा ट्विस्ट काय होता
सोशल मीडियावर तुफान वेगाने धावणाऱ्या जर्मनीच्या अब्जाधीश कुत्र्याची बातमी पूर्णपणे फेक न्यूज होती जी मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरवण्यात आली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नेटफ्लिक्स या कुत्र्यावर एक डॉक्युमेंट्री फिल्म देखील बनवत आहे, ज्यामध्ये त्याचे सर्व पैलू कव्हर केले जातील, कुत्र्याच्या श्रीमंतीची बातमी लोकांच्या कानावर कशी घातली गेली आणि लोकांनी त्यावर विश्वास कसा ठेवला याची माहिती या डॉक्युमेंट्री फिल्ममध्ये Netflix देणार आहे.
हे पण वाचा :- Best Zodiac Girl For Marriage: ‘या’ 4 राशीच्या मुली ठरतात बेस्ट वाइफ ! कोणत्याही अडचणीत सोडत नाही त्यांच्या जोडीदाराला साथ