बडूर : बिलोली बाजारात प्रति क्विंटल तुरीला गेल्या २ महिन्यापूर्वी तुरीचे भाव बाजारात १० ते ११ हजार भाव मिळत होता. आता तूर शेतकऱ्यांच्या दारात काय पोहचते. त्या आधीच तुरीचे बाजार भाव ४ हजारांनी घसरून प्रती क्विंटल ७ हजार ५०० रुपयांच्या आत भाव येऊन ठेपली आहेत.
सद्यस्थितीत सोयाबीनचे भाव ४ हजार ३०० पाठोपाठ तूर उत्पादक, शेतकरी मोठया आर्थिक कोंडीच्या सपाटयात सापडला आहे. सद्यस्थितीत सर्वत्र तूर पीक कापणी मळणीच्या प्रक्रियेत शेतकरी वर्ग व्यस्त आहे. तुर पिकाच्या अंतिम काढणीसाठी लागणाऱ्या मजुरांच्या खर्चाच्या आर्थिक तडजोडीत व्यस्त आहे. यामुळे तुरीच्या उत्पादनात ही तालुक्यात वाढत्या महागाईमुळे तूर पीक घेण्यासाठी लागणाऱ्या खत, औषधी, मजूर, अंतर्गत मशागत खर्चत कापणी झाल्याने यंदा तूर लागवड खर्चात वाढ झाली आहे

तालुक्यात तूर पिकाचे क्षेत्र अत्यल्प आहे. त्यातही दूर पीक हे वार्षिक पीक म्हणून या पिकाची बहुदा लागवड शेतकरी अंतर पीक म्हणून करीत असतात. तूर पिकावर वार्षिक वातावरणाचाही सातत्याने मोठा परिणाम होत असतो. याही वर्षी बदलत्या वातावरणाचा फटका तूर उत्पादक शेतकरी यांना बसला आहे.
बदलत्या वातावरणाने उत्पादनात मोठी घट
पुन्हा मोठी भ्रम निराशा आधीच सोयाबीन पिकाचा मोठा फटका सेतक-यांना बसलेला असताना तूर पिकावर मोठी आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना बाजार भावात झालेल्या मोठ्या इसरणीनेने पुन्य मोठी भ्रम निराला शेतकऱ्यांच्या पदरात पडल्याचे बोलल्या जात आहे.