TVS EV Scooter : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तसेच देशात महागाई वाढत असल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील वाहने वापरणे नागरिकांना आता न परवडण्यासारखे झाले आहे. म्हणूनच ऑटो क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्याकडे भर दिला आहे. ग्राहकही इंधनाची वाहन न खरेदी करता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत.
जर तुम्हीही दररोज बाईक किंवा स्कूटरमध्ये पेट्रोल टाकून वैतागला असाल तर तुमच्यासाठी आता TVS कंपनीकडून शानदार इलेक्ट्रिक स्कूटर आणली आहे. यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
TVS iQube ही भारतीय बाजारात सादर करण्यात आली आहे. ही स्टायलिश लुक आणि स्मार्ट वैशिष्ट्यांसह बाजारात सादर करण्यात आली आहे. या स्कूटरचे मायलेज देखील दमदार देण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 4 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते
TVS iQube दोन प्रकारात आणि सात रंगांच्या पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध आहे
या इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्कूटर खरेदी करताना दोन स्कूटरपैकी एक पर्याय निवडत येऊ शकतो. ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी चार ते साडेचार तास लागतात.
एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर १०० किमीपर्यंत प्रवास करू शकता. TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर ७ रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ७ पैकी कोणत्याही रंगाची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. स्कूटरमध्ये 3000 डब्ल्यू पॉवर जनरेटिंग मोटर आहे जी स्कूटरला शक्तिशाली बनवते. स्कूटरमध्ये U आकाराचे LED DRL आहेत.
स्कूटरला स्मार्ट वैशिष्ट्य मिळतात
सुरक्षेचा विचार करून स्कूटरला पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत . TVS iQube या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 99130 रुपये सुरुवातीच्या किमतीत बाजारात उपलब्ध आहे.
स्कूटरमधील 12 इंच चाके याला डॅशिंग लुक देतात. या चाकांमध्ये आणखी टेलिस्कोपिक काटे आणि दुहेरी शॉक एब्जॉर्बर आहेत. ही स्कूटर बाजारात Ather 450, Bajaj चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला थेट टक्कर देते. स्कूटर TVS SmartXonnect वैशिष्ट्यासह येते ज्यामुळे तुमच्या स्मार्ट फोनशी कनेक्ट करणे सोपे होते.