Upcoming Smartphones : भारतात लवकरच लॉन्च होणार हे 5 शानदार स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षाही कमी…

Ahmednagarlive24 office
Published:

Upcoming Smartphones : भारतात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. पण काही स्मार्टफोन्सची किंमत जास्त असल्याने अनेकजण ते खरेदी करू शकत नाहीत. पण आता भारतात लवकरच तुमच्या बजेटमधील स्मार्टफोन्स लॉन्च होणार आहेत.

भारतात लवकरच ५ जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. ज्याची किंमत १० हजार रुपयांपेक्षाही कमी असेल. त्यामुळे तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थोडं थांबा… खालील स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहेत.

Vivo Y02A

विवो कंपनीचे अनेक दमदार स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांकडून देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. Vivo Y02A हा स्मार्टफोन जुलैमध्ये लॉन्च होणार आहे. ज्याची किंमत 8,999 रुपयांपर्यंत असू शकते. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 3 जीबी रॅम मिळू शकते.

Xiaomi Redmi A2

Xiaomi कंपनीच्या स्मार्टफोन्सनी ग्राहकांना वेड लावले आहे. आता कंपनीकडून Redmi A2 हा स्मार्टफोन लॉन्च केला जाऊ शकतो. 28 एप्रिल रोजी Redmi A2 स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोनची बाजारातील किंमत 8,999 रुपयांपर्यंत असू शकते. या फोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरासह सिंगल रियर कॅमेरा सेटअपस दिला जाणार आहे.

नोकिया C12 प्लस

नोकिया कंपनीकडून देखील नोकिया C12 प्लस स्मार्टफोन मे महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये असू शकते. तसेच 8 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासह हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे.

Honor X5

Honor X5 हा स्मार्टफोन देखील 28 एप्रिल 2023 रोजी भारतीय बाजारात लॉन्च केला जाणार आहे. या स्मार्टफोनची भारतीय बाजारातील किंमत 8,690 रुपयांपर्यंत असू शकते. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकता.

टेक्नो स्पार्क 10C

कमी किमतीमध्ये तुम्हाला अधिकाधिक फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Tecno Spark 10C हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. 24 एप्रिल 2023 रोजी हा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. याची किंमत 9,490 रुपयांपर्यंत असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe