UPI Payment साठी चुकूनही ‘या’ पद्धतींचा वापर करू नका नाहीतर भरावे लागेल 1.1 Percent Charge!

Published on -

UPI Payment : सोशल मीडियावर मागच्या काही  दिवसांपासून UPI पेमेंटची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. अनेकजणांच्या मनात पुन्हा पुन्हा हा प्रश्न उपस्थित होत आहे की UPI पेमेंटसाठी वेगळे शुल्क द्यावे लागेल का? यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखात काही गोष्टींची माहिती देणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

UPI Merchant Transaction वर Prepaid Payment Instrument (PPI) लागू होईल. जर एखाद्या व्यक्तीने मोबाईल वॉलेटच्या मदतीने व्यापाऱ्याला पेमेंट ट्रान्सफर केले तर Interchange Fees लागू होईल आणि हे शुल्क व्यापाऱ्याकडून घेतले जातील. म्हणजेच 1.1 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त इंटरचेंज फी घेतली जाईल. इंटरचेंज फी व्यापारी, मोठे व्यापारी आणि छोटे ऑफलाइन व्यापारी यांना लागू होणार आहे.

Extra Charges on Payment

कार्ड आणि वॉलेट PPI अंतर्गत समाविष्ट आहेत. या दोन्ही पद्धतींच्या मदतीने पेमेंट करण्यासाठी तुम्हाला हे शुल्क भरावे लागेल. सहसा असेही दिसून येते की जेव्हा तुम्ही कार्डद्वारे पैसे भरण्यास सांगता तेव्हा दुकानदार तुमच्याकडून अतिरिक्त शुल्काची मागणी करू लागतो. ही फी नवीन नसली तरी ती फार पूर्वीपासून लागू केली जात आहे.

Wallet Charges

NPCI च्या परिपत्रकात अशी माहिती देण्यात आली आहे की पीअर-टू-पीअर (P2P) आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट (P2PM) मधील बँक खाते आणि PPI वॉलेट यांच्यातील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारावर वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.

म्हणजे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. UPI पेमेंट अजूनही सामान्य वापरकर्त्यासाठी पूर्णपणे मोफत राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबत एक बातमी व्हायरल झाली होती. यावर एनपीसीआयने स्पष्टीकरण देत कोणतेही नवीन शुल्क आकारले जात नसल्याचे सांगितले.

हे पण वाचा :- Chandra Grahan 2023: सावधान ! वर्षातील पहिले चंद्रग्रहण ‘या’ राशींना भारी पडू शकते ; होणार धनहानी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News