Vande Bharat Express : वंदे भारतचा लाजीरवाणा रेकॉर्ड ! तीन वर्षांत वेग झाला कमी

Ahmednagarlive24 office
Published:

गेल्या ३ वर्षांत वंदे भारत रेल्वेंच्या सरासरी वेगात घट झाली आहे. २०२०-२१ मध्ये ८४.४८ किलोमीटर ताशी वेगाने – धावणारी रेल्वे २०२३-२४ या – वर्षात ताशी ७६.२५ वेगाने धावू लागल्याची बाब माहिती अधिकार कायद्या (आरटीआय) अंतर्गत केलेल्या एका अर्जातून समोर आली.

मात्र, केवळ – वंदे भारत रेल्वेंचाच नाही तर – इतर रेल्वेंचादेखील वेग कमी झाल्याचे ही माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे कार्य सुरू असलेल्या ठिकाणी रेल्वेंच्या सरासरी वेगात घट झाली आहे.

मुंबईतील सीएसएमटी व मडगाव या दरम्यानच्या वंदे भारत ट्रेनचे – उदाहरण देत केंद्रीय रेल्वे झोनच्या अधिकाऱ्याने रेल्वेंचा वेग कमी होण्याची कारणे सांगितली. कोकण – रेल्वेचे बहुतांश क्षेत्र घाटाचे असून या भागात उंचावरील पर्वत

रांगांमधून रेल्वेला प्रवास करावा लागतो. या दुर्गम भागात रेल्वेंचा वेग वाढल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पावसाळ्यात रेल्वे गाड्या सुरू ठेवणे मोठे आव्हान असल्याने रेल्वेंचा वेग सरासरी ७५ किलोमीटर प्रतितास ठेवावा लागत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

२०२०-२१ या वंदे भारत ट्रेनचा वेग प्रतितास ८४.४८ किमी होता. मात्र, २०२२-२३ मध्ये त्यात घट होऊन तो ८१.३८ किमी प्रतितास झाला. २०२३-२४ या वर्षात या रेल्वेंच्या वेगात आणखी घट होऊन तो प्रतितास ७६.२५ किमी झाल्याची बाब आरटीआय अंतर्गत मागितलेल्या माहितीतून समोर आल्याचे मध्य प्रदेशचे आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी स्पष्ट केले. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी देशात सुरू झालेली वंदे

भारत एक सेमी-हायस्पीड ट्रेन असून ती तासाला जास्तीत जास्त १६० किमी वेगाने धावू शकते. मात्र, रेल्वेच्या परिस्थितीमुळे दिल्ली-आग्रा हा मार्ग सोडला तर वंदे भारत एक्स्प्रेस कोणत्याच रेल्वे मार्गावर १३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकत नाही.

वंदे भारत रेल्वे अपेक्षित वेगाने धावण्यासाठी रेल्वे रुळांची दुरुस्ती करून ते अद्ययावत करण्यात येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेचा वेग कमी झाला आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे कार्य पूर्ण झाल्यानंतर २५० किमी प्रतितास या वेगाने रेल्वे धावू लागले, असा दावा रेल्वे अधिकाऱ्याने केला आहे.

वंदे भारत रेल्वेचा वेग मर्यादित असला तरी ३१ मार्चपर्यंत २.१५ कोटींहून अधिक लोकांनी या ट्रेनने प्रवास केल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. देशातील एकूण २८४ जिल्हे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले गेले असून देशातील रेल्वे जाळ्यांच्या १०० मार्गावर एकूण १०२ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe