Vastu Tips News : आजकाल प्रत्येकजण श्रीमंत होण्यासाठी मेहनत करत आहे. तसेच प्रत्येकाचे पैसे कमावण्याचे मार्ग देखील वेगवेगळे आहेत. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरामधील अनेक गोष्टी तुम्हाला श्रीमंत होण्यापासून थांबवत असतात. त्यामुळे अशा काही गोष्टी त्वरित घराबाहेर काढणे गरजेचे असते.
घरामध्ये काही अनावश्यक गोष्टी ठेवल्याने घरातील वातावरण देखील ताणतणावात असते. तसेच आर्थिक स्थिती देखील ढासळत जात असते. अशा काळात तुमची कोणीही साथ देणार नाही. जर तुम्हाला जीवनात श्रीमंत होईचे असेल तर तुम्हाला आजच घरामधून काही वस्तू बाहेर टाकाव्या लागतील.
या निरुपयोगी गोष्टी आजच घरातून काढून टाका
घरात तुटलेल्या वस्तू ठेवू नका
अनेकदा लोक घरामध्ये तुटलेल्या वस्तू ठेवत असतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये कधीही तुटलेली किंवा फुटलेली वस्तू ठेऊ नका. असे केल्याने घरामध्ये गरिबी येते. तुम्हीही कितीही पैसे कमावण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याकडे पैसे टिकणार नाहीत. त्यामुळे ताबडतोब अशा वस्तू घराबाहेर टाकून द्या.
बंद घड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅझेट्स ठेवू नका
घरामध्ये अनेकजण बंद पडलेले घड्याळ, जुना टीव्ही, रेडिओ, फ्रीज किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवत असतात. यामुळे गरिबी येते आणि घरातील लोक सतत आजारी पडत असतात. त्यामुळे अशा वस्तू लगेच घराबाहेर फेकून द्या.
जुने खराब झाडू, तुटलेली भांडी ठेवू नका
तुमच्याही घरामध्ये तुटलेले किबवा जुने झाडू असतील तेही ठेऊ नका. कारण असे केल्याने तुमच्याकडे पैसे येणार नाहीत. तसेच तुटलेली भांडी देखील घरामध्ये ठेऊ नयेत. असे केल्यास तुम्ही कर्जबाजारी व्हाल.
घाणेरडे, फाटलेले व जीर्ण कपडे घालू नका
एखाद्या व्यक्तीचे नशीब देखील तो कोणत्या प्रकारचे कपडे घालतो यावर अवलंबून असते. माणसाने नेहमी नीटनेटके, स्वच्छ आणि चांगले कपडे घालावेत. कपडे जुने असतील पण फाटलेले नसतील. अशा प्रकारे माणूस स्वतःला श्रीमंत बनवू शकतो.
घरात घाण ठेवू नका
अनेकांच्या घरामध्ये घर किंवा खोलू झाडून घेतल्यानंतर कचरा तसाच ठेवला जातो. तसेच दररोज फारशी पुसली जात नाही. त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होत असतात. घरातील कचरा रोज बाहेर टाकावा, तसेच दररोज फारशी पुसावी.