Vehicle Details : तुमच्या गाडीला कोणी टक्कर दिली आणि पळून गेला तर टेन्शन नाही, चुटकीसरशी मोबाईलवरून मिळवा माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

Vehicle Details : देशात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेकदा तुम्ही देखील कार किंवा बाईकने प्रवास करत असताना समोरचा व्यक्ती तुमच्या बाईक किंवा कारला टक्कर देतो आणि पळून जातो. त्यामुळे तुमचे नुकसान होते आणि टक्कर देणारा व्यक्ती सहज निसटून जातो.

पण आता काळजी करू नका. कारण आता तुमच्या बाईक किंवा कारला टक्कर देणाऱ्या व्यक्तीची माहिती तुम्ही लगेच सहजासहजी मिळवू शकता. आणि त्याच्याबद्दल तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये कळवू शकता.

तुमच्या कारला टक्कर दिल्यानंतर समोरच्या कारचा नंबर तुम्ही लक्षात किंवा नोट करून ठेवा. जर तुम्ही हा नंबर नोट करून ठेवला तर त्या व्यक्तीची माहिती काढण्यास तुमची सहजासहजी मदत होईल.

तुम्ही लक्षात ठेवलेला किंवा नोट करून ठेवलेला नंबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देऊन शकता. तसेच त्या कार चालकाबाबत तुम्ही तक्रार देखील करू शकता. तसेच तुम्ही स्वतः देखील या कारबद्दल माहिती काढू शकता. कारचा नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टाकून सहजपणे तुम्ही माहिती काढू शकता.

वाहन क्रमांकाद्वारे वाहन मालकाची माहिती मिळवा

तुमच्या कारला टक्कर देणाऱ्या कारचा नंबरवरून तुम्ही सहज समोरच्या कारबद्दल माहिती मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर Vaahan (सरकारी वेबसाइट) ला भेट द्यावी लागेल. ही वेबसाईट तुम्हाला वाहन मालकाचे नाव सोबत चेसिस नंबर, इंजिन नंबर, वाहनाचा वर्ग इत्यादी देखील देते.

काय आहे प्रोसेस?

सर्वप्रथम VAHAN च्या अधिकृत वेबसाइटवर जा
पृष्ठाच्या शीर्षस्थानी दिसणारे तुमचे वाहन तपशील जाणून घ्या वर जा.
यानंतर, ज्या वाहनाचा तपशील आवश्यक आहे त्या वाहनाचा नोंदणी क्रमांक टाका.
यानंतर वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक, वाहन मालकाचे नाव, वाहन वर्ग आदी माहिती उपलब्ध होणार आहे.
यासोबतच रोड टॅक्स भरणे, प्रदूषण नियंत्रणात अर्थात पीयूसी आणि वाहन विमा याचीही माहिती मिळणार आहे.

ही माहिती तुम्ही एसएमएसद्वारेही मिळवू शकता. यासाठी तुम्हाला VAHAN <space> वाहन क्रमांक एसएमएसमध्ये लिहून 7738299899 वर पाठवावा लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe