विराट कोहली – अनुष्का शर्माला झाले कन्यारत्न !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपट्टू विराट कोहली यांना कन्यारत्न झाले आहे.

आपल्या पहिल्या अपत्याच्या वेळी अनुष्का सोबत राहता यावे म्हणून विराट ऑस्ट्रेलिया दौरा सोडून मायदेशात परतला होता.विराट आणि अनुष्काची पहिली भेट एका जाहिरातीच्या दरम्यान झाली होती.

त्यावेळी दोघे पण एका जाहिरातीचे शूटिंग करत होते. विराटने त्याच्या आधी कोणत्याही अभिनेत्रींसोबत काम केले नव्हते.त्यामुळे तो सेटवर जरा नर्व्हस झाला होता.

त्यानंतर त्यांच्यात फ्रेंडशिप झाली आणि मग ते एकमेकांना भेटू लागले.काही वेळेपर्यंत त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवला आणि मग नंतर त्यांनी इटलीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत धूम धडाक्यात लग्न केले.

काही दिवसांपूर्वी त्यांचे खाजगी फोटो काढले होते. त्यांचे खाजगी फोटो पापाराझीनी काढले होते.ते पाहून अनुषकाला राग अनावर झाला होता. त्यानंतर तिने त्यासंदर्भातील नाराजी सोशल मीडियावर बोलून पण दाखवली होती.

पापाराझीचा तिने चांगलाच क्लास घेतला होता.विराट आणि अनुष्का एमकेकांसोबत वेळ घालवत असताना काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe