कार घ्यायचीये आणि बजेट 3 लाख रुपये आहे ? Datsun Redi Go खरेदी करा; जाणून घ्या किंमत , डिस्काउंट व फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- भारतीय बाजारामध्ये डॅटसनने कमी किमतीच्या मोटारींमध्ये आपला चांगलाच ठसा उमटविला आहे. ही कंपनी मध्यमवर्गीय कुटूंबाचे बजेट लक्षात घेऊन कारची आखणी करते.

कंपनीच्या डॅटसन रेडी गो चे बेस मॉडेल म्हणजेच डी व्हेरिएंट पेट्रोल 3 लाख 15 हजार रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता. डॅटसनच्या अधिकृत वेबसाइटनुसार या कारला एका लिटर पेट्रोलवर 22 किमीचे मायलेज मिळते. जर आपण तीन लाख रुपयांमध्ये छोटी कार घेण्याचा विचार करत असाल तर आपण ही कार खरेदी करू शकता.

कंपनी या कारवर 35 हजार रुपयांपर्यंत सवलत देत आहे. डॅटसनच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या ऑफरअंतर्गत ग्राहकांना 15,000 रुपये रोख सूट आणि 15,000 पर्यंत एक्सचेंज बोनस मिळेल. याशिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट बोनसही दिला जात आहे.

ही 5 सीटर कार आहे. त्याचे इंजिन 67 बीएचपी पॉवर आणि 104 एनएम टॉर्क जनरेट करते. डॅटसन गो च्या तीन पेट्रोल वेरिएंट मध्ये (डी, ए, टी) एक 799 सीसी इंजिन आहे. यात व्हील कव्हर्स, ड्रायव्हर एअर बॅग, पॉवर स्टीयरिंग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम मिळते. डी व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 2.86 लाख, ए व्हेरिएंटची किंमत 3.61 आणि टी व्हेरिएंटची किंमत 3.84लाख रुपये आहे.

तिन्ही प्रकारांमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या तीन कारमधील बूट स्पेस 222 लिटर आहे. या कारमध्ये पॉवर एडजस्टेबल एक्सटीरियर रीअर व्यू मिरर, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, फॉग लाइट्स – फ्रंट आणि पॉवर विंडो रियर मिळत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment