Electric Vehicle Subsidy : भारतीय ऑटो क्षेत्रात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच अनेक कंपन्यांकडून वेगवेगळी इलेक्ट्रिक वाहने बाजारात लॉन्च केली जात आहेत. इंधनाच्या किमती वाढल्याने अनेक नागरिक वाहन खरेदी करत असताना इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देताना दिसत आहेत.
सध्या बाजारात दुचाकी, चारचाकी तसेच तीन चाकी वाहनांची इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च झाली आहेत. ही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करून तुम्ही पेट्रोल आणि डिझेलवरील खर्च वाचू शकतो. तसेच सरकारकडून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी सबसिडी देखील दिली जात आहे.
केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारकडून अनुदान दिले जात आहे. सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी 80% पर्यंत सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजना मंजूर
केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन सबसिडी योजना २०२२ मध्ये लागू करण्यात आली आहे. देशातील वाढती प्रदूषण समस्या पाहता सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन उत्पादित करण्यासाठी तसेच खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे देशातील वाढते प्रदूषण कमी करण्यास मदत होईल असा सरकारचा मानस आहे. इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे परवडत नाही.
त्यामुळे लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे पाठ फिरवली आहे. त्यासाठी सरकारकडून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण सरकारकडून फक्त भारतात तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांवरच सबसिडी दिली जाणार आहे.
कशी मिळवायची सबसिडी?
जर तुम्ही भारतीय इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत असाल तर तुम्हाला सबसिडी दिली जाईल. पण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत असताना डीलर्सला सर्व आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील. तुम्ही दिलेली सर्व कागदपत्रे सरकारकडे देण्यात येतील.
सरकारकडून तुम्ही दिलेली कागदपत्रे पडताळली जातील आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला काही दिवसांनी सबसिडी देखील दिली जाईल. ही सबसिडी तुम्ही नोंदणी केलेल्या बँक खात्यात जमा होईल.