शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु करायचीय ? वाचा सविस्तर माहिती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-अनेक लोकांना वाटते की शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी मोठे भांडवल लागते, त्यामुळे ते यापासून दूर राहतात. मात्र सत्य यापेक्षा खूप वेगळे आहे. तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीद्वारे शेअर बाजारात प्रवेश करू शकतात.

उदा. दरमहा ५०० रुपये, १०० रुपयेदेखील आपल्या इच्छेनुसार पुरेसे होतात. वास्तविक पाहता, संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे अल्प प्रमाणात गुंतवणूक करण्याची सवय लावणे. सतत गुंतवणूक करण्याच्या सवयीने आपण भविष्यात उत्तम आर्थिक स्थितीत पोहोचू. शेअर बाजारात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत याबद्दल सांगताहेत फिनॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रांजल कामरा.

दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवा: आपण तुम्ही पहिले पाऊल उचलले आहे. दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने आपल्याला जबाबदारीचे भान येते. दरम्यान, आपल्यला भविष्यात कधी पैसा लागू शकतो याची तात्पुरती कल्पना आल्याला येते. त्यामुळे आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्याने चांगले रिटर्न्स मिळतात कारण, बाजारातील शॉर्ट-टर्म चढ-उतारांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.

सातत्य राखा: या प्रवासात सातत्य राखल्याने तुम्ही खूप दूर जाऊ शकाल. कारण गुंतवणुकीसाठी सततची वचनबद्धता आवश्यक असते. एक गुंतवणूकदार म्हणून उत्तम परतावे मिळवण्यासाठी तुम्ही नियमित आणि सतत प्रयत्न केले पाहिजेत. नियमितपणे एखादी रक्कम गुंतवणूक करणे, हेच महत्त्वाचे आहे. तुम्ही ठरवलेल्या आठवड्यात पैसे बाजूला काढता आले नाहीत तर त्यापुढील आठवड्यात ते काढण्याचा प्रयत्न करा.

जोखीमीची सहनशक्ती समजून घेणे आवश्यक आहे: आपली जोखीम पत्करण्याची ताकद तसेच जोखीम असताना कुठे थांबायचे हे समजल्यास तुम्ही हा गुंतवणुकीचा प्रवास आनंददायी करू शकता. एक गुंतवणणूकदार म्हणून, आपल्या व्यक्तीमत्त्वाची ओळख करून घेतल्यास गुंतवणुकीच्या प्रवासावर लक्ष ठेवण्यास मदत होईल. उदा. तुमची जोखिमीची सहनशक्ती समजून घेतल्यास, तुम्हाला नंतर अस्थिर करतील, असे निर्णयच घेऊ नका.

याचवेळी, तुम्ही कोणती जोखीम सहन करू शकता, याचेही स्पष्टचित्र तुमच्यासमोर असेल. भावनांवर नियंत्रण ठेवा: आपल्या गुंतवणुकीच्या मार्गावर भावनिक क्षणांचा सामना करावाच लागणार आहे. पैसा कमावणे आणि तोच गमावणे या विचारान तुम्ही अनेकदा अडकाल. अशा वेळी, आपण निराश होऊ नये किंवा भावनिक क्षणांवर आधारीत निर्णय घेऊ नये. निर्णायक खेळी करणे आणि भिती किंवा क्षणाची गरज म्हणून निर्णयय घेणे टाळल्यास उत्तम नफा मिळवता येईल.

गुंतवणुकीत वैविध्य ठेवा: विविधता हा उत्तम पर्याय व अर्थातच बॅकअप प्लॅन असतो. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीच्या करिअरमधला हा महत्तत्वाचा घटक असला पाहिजे. प्रतिकुल क्षेत्रीय परिस्थितीतून हे गुंतवणुकीला वाचवते. व योग्य गती राखण्यास सक्षम करते. अशा प्रकारे, वैविध्यीकरण हे तुमच्या नुकसानीविरुद्धची ढाल आहे.आपण केवळ ठराविक क्षेत्रातच नव्हे तर त्यांच्या अंतर्गत आणि सर्व कमोडिटी आणि शक्य असल्यास बाँडमध्येही गुंतवणूक करा.

कधी कधी, गुंतवणुकीचा प्रवास त्रासदायक ठरू शकतो, कारण आर्थिक अडचणी आता किंवा नंतर कधीही यऊ शकतात. त्यामुळे बाजार घसरल्यावर सर्व मालमत्ता गमावण्यापासून बचाव कण्यासाठी अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. अखेरीस, तुम्ही किती संपत्ती बुक करू शकता, यावर तुम्ही गुंतवणूकदार म्हणून किती हुशार आहात, हे कळते. तुमच्या प्रवासात घेतलेले लहान आणि मोठ्या निर्णयावरच शेवटचे परिणाम ठरतात. हे करताना, वर नमूद केल्याप्रमाणे अनुभवानुसार आखलेली धोरणे आणि प्रयत्नानुसार चालणे, नेहमीच योग्य ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment