Weather forecast : देशात सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. मात्र अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल होत असल्याने पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भर्तरीय हवामान विभागाकडून ७ राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तापमानात बदल होत असल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याकडून उद्या दिल्ल्लीसहित पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालयीन भागात पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच या राज्यांमध्ये पाऊस पडल्यानंतर त्याचा वेग आणखी वाढून इतर राज्यांमध्ये पाऊस पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.हवामान बदलामुळे पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
24 ते 26 जानेवारीपर्यंत पावसाचा वेग कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि यूपीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय 24 आणि 26 जानेवारीला राजस्थान आणि मध्य प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याच वेळी, 27 जानेवारीपासून उत्तर पश्चिम भारतात एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स येणार आहे.
या राज्यांमध्ये बर्फवृष्टीची शक्यता
जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये २४ आणि २५ जानेवारीला पाऊस पडण्याची शक्यता वारवण्यात आली आहे. 25 आणि 26 रोजी उत्तराखंडमध्ये पाऊस पडणार आहे तसेच या दरम्यान या सर्व राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यताही भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये पुढील पाच दिवस तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. त्याचवेळी हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये पुढील २४ तासांत सकाळी आणि संध्याकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.