Mukesh Ambani Driver Salary : मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार किती असेल? जाणून तुम्हालाही बसेल धक्का

 

Mukesh Ambani Driver Salary : देशातील सर्वात श्रीमंत आणि दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. तसेच दरवर्षीं त्यांच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामागील कारण त्याचे मोठमोठे उद्योग आहेत.

मुकेश बई यांच्या ड्रायव्हरचा पगार जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तुम्ही विचार कराल की काहीवेळा तुमचाही २ वर्षाचा पगार यामध्ये जाऊ शकतो. मुकेश अंबानी यांचे नाव ऐकले की सर्वांच्या डोळ्यासमोर त्यांची श्रीमंती आणि आणि त्यांचे उद्योगधंदे उभे राहतात.

मुकेश अंबानी यांची संपत्ती अब्जाधीशांमध्ये आहे. तसेच त्यांच्या मुंबईतील अँटिलिया या घरामध्ये शेकडो कर्मचारी कामाला आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार लाखोंच्या घरात आहे. तर मग ड्रायव्हरचा पगार तर नक्कीच त्यापेक्षा जास्त असू शकतो.

सध्या सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरच्या पगाराबद्दलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सन 2017 मध्ये मुकेश अंबानींच्या वैयक्तिक ड्रायव्हरचा पगार दरमहा सुमारे 2 लाख रुपये होता.

लाइव्ह मिंटच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारे अंबानींच्या ड्रायव्हरचा वार्षिक पगार 24 लाख रुपये होतो. हा पगार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक व्यावसायिकांपेक्षा जास्त आहे.

पण मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचे 2023 सालातील सॅलरी पॅकेज काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 2017 नंतर त्यात नक्कीच वाढ झाली असेल. आता हे प्रमाण इतके वाढले असावे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लाज वाटावी.

ड्राइव्हरला कडक प्रशिक्षण दिले जाते

अंबानी यांच्या कुटुंबामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना खासगी कंत्राटी फर्मच्या माध्यमातून कामावर घेतले जाते. तसेच जे ड्रायव्हर म्हणून कामावर रुजू होतात अशा लोकांना कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते.

अंबानी कुटुंबातील सदस्यांच्या कारवर जे ड्राइव्हर असतात त्यांना बुलेटप्रूफ वाहने चालवावी लागतात. जे अंबानी कुटुंबातील कर्मचारी ड्राइव्हर असतात ते व्यावसायिक आणि लक्झरी वाहने चालवण्यात माहीर असतात.

मुकेश अंबानी यांच्या घरातील कर्मचारी स्टाफ आणि ड्राइव्हर यांना इतर भत्ते आणि विमा देखील दिला जातो. त्यामुळे अंबानी कुटुंबात जे कर्मचारी स्टाफ काम करतात अशा लोकांना पगार देखील जास्त आहे.

इतर सेलिब्रिटींच्या ड्रायव्हरचाही त्यांचा पगारही जाणून घ्या

सेलिब्रिटींच्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड्सचे पगार नेहमी चर्चेत असतात. सलमान खान आणि अक्षय कुमार यांसारखे अनेक सेलिब्रिटी आपल्या बॉडीगार्डला करोडोंचे मानधन देतात. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा, जो त्याच्यासोबत 20 वर्षांपासून आहे, दरवर्षी 2 कोटी रुपये घेतो.

तसेच, करीना कपूर आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या आयाला दरमहा 1.50 लाख रुपये देते. हे ओव्हरटाइमसाठी 1.75 लाख रुपयांपर्यंत जाते. अक्षय कुमारच्या बॉडीगार्ड श्रेयस तो दरवर्षी 1.2 कोटी रुपये मानधन घेतो.