Mumbai Top Expensive Homes : मुंबईतील सर्वात महागडे घर कोणाकडे आहे? जाणून घ्या मालकांच्या नावाची यादी…

Ahmednagarlive24 office
Published:

Mumbai Top Expensive Homes : तुम्ही कधी मुंबईमध्ये गेला असाल तर तुम्ही अनेकदा खूप मोठमोठे बंगले किंवा इमारती पहिल्या असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मुंबईमधील सर्वात महागडे घर कोणाकडे आहे. नाही ना? तर चला जाणून घ्या कोणाकडे आहे मुंबईतील सर्वात महागडे घर…

अँटिलिया : मुकेश अंबानी आणि कुटुंब

तुम्ही अंबानी हे नाव तर सतत ऐकत असाल. तर फोर्ब्सने मुकेश अंबानींच्या प्रसिद्ध अँटिलियाची किंमत $1 अब्ज असल्याचे नोंदवले आहे. अंबानी यांचे हे घर जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे.

अँटिलियामध्ये 27 मजले आहेत आणि 9 हाय-स्पीड लिफ्ट आहेत. अहवालानुसार, घरामध्ये 168 गाड्या बसू शकतात. यात 3 हेलिपॅड, एक भव्य बॉलरूम, एक थिएटर, एक स्पा आणि अनेक बागा आहेत.

जाटिया हाऊस : कुमार मंगलम बिर्ला

मुंबईतील सऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे घर आदित्य बिर्ला समूहाचे चौथ्या पिढीचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांचे मुंबईच्या पॉश मलबार हिलच्या वर असलेल्या जाटिया हाऊस हे आहे. हे घर 2926 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेले आहे आणि किमान 28,000 स्क्वेअर फूट इतके बिल्ट-अप क्षेत्र आहे.

गुलिता: ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे घर

२०१२ साली पिरामलने याने मुंबईमध्ये एक वाडा विकत घेतला आहे ज्याची किंमत 452 कोटी रुपये होती. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल राहत असलेल्या घरात पाच मजले, तीन तळघर आहेत, त्यापैकी दोन पार्किंगसाठी राखीव आहेत.

लिंकन हाऊस: सायरस पूनावाला यांचे घर

सायरस पुनावाला यांचे मुंबईतील 78, भुलाभाई देसाई रोड येथे लिंकन हाऊस म्हणून निवास्थान आहे. लिंकन हाऊस मूळतः वांकानेरचे महाराज, प.पू. सर अमरसिंहजी बनसिंहजी आणि त्यांचे पुत्र प्रतापसिंहजी झाला यांच्यासाठी बांधले गेले होते. विकिपीडियाच्या मते, सप्टेंबर 2015 मध्ये, पूनावाला समूहाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना ते 7.5 अब्ज (US$113 दशलक्ष) मध्ये विकले गेले.

मन्नत: अभिनेता शाहरुख खानचे घर

वांद्रे येथे अभिनेता शाहरुख खानचे मन्नत नावाचे आलिशान घर आहे. ज्याची किंमत 200 कोटी आहे. घरामध्ये सहा मजली अॅनेक्सी, टेरेस, एक बाग, लिफ्ट व्यवस्था, एक खाजगी थिएटर, खाजगी क्वार्टर आणि प्रशस्त मनोरंजन जागा आहेत.

रतन टाटा यांचे घर

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांचे कुलाबा येथे याक आलिशान घर आहे. हाऊसिंग डॉट कॉमच्या मते, टाटा सुमारे 150 कोटी रुपयांच्या हवेलीत राहतात, जे 13,350 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले आहे.

जलसा: अमिताभ बच्चन यांचे घर

अभिनेते अमिताभ बच्चन यांचा देखील मुंबईमध्ये एक आलिशान बंगला आहे. ज्याचे नाव जलसा असून त्याची किंमत 112 कोटी रुपये आहे. हे घर बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता रमेश सिप्पी यांनी भेट म्हणून दिला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe