Who is Xavier : सोशल मीडियावर झेविअर सध्या खूप व्हायरल होत आहे. मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा झेविअर नक्की कोण आहे. तर हा वेगवेगळ्या पोस्टवर कमेंट करत असतो आणि याच्या कमेंट खूप व्हायरल होत असतात. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे.
इंटरनेटवर सध्या झेविअर खूपच व्हायरल झाला आहे. फेसबुक,इंस्टाग्राम वरील कोणत्याही पोस्टखाली हा माणसू वेगवेगळ्या कमेंट करत असतो. याच कमेंट खूप व्हायरल होतात. सध्या या माणसाच्या नावाने अनेक मीम पेजेस, ट्वीटर अकांउट्स,युट्युब प्रोफाईल्स बनवलेले आहेत.
ही व्यक्ती सोशल मीडियावर इतकी कशी व्हायरल झाली? तसेच या माणसाने केलेल्या कमेंट का व्हायरल होत आहेत? दररोज केलेल्या कमेंट कशा व्हायरल होत आहेत? याबाबद्दल जाणून घेऊया…
हा फोटो असणारे प्रोफाईल सर्वात पहिल्यांदा जगासमोर आले ते २०१३ मध्ये.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या झेविअर नावाच्या व्यक्तीने जुलै २०१३ मध्ये ‘पकालु पपितो’ या नावाने एक ट्वीटर अकाउंट सुरु केले. या ट्वीटर अकाउंट वरून तो दररोज काही ना काही मजेशीर ट्वीट्स करायचा.
थोड्याच दिवसांत या पकालु पपितो अकाउंटवरून विनोदी ट्विट्स जगभर व्हायरल झाले. लोकही अशा विनोदी ट्विट्सला भरभरून प्रतिसाद देऊ लागले. ट्विट्सबरोबर हा व्यक्ती अनेक वेगवेगळी चित्रे किंवा एखादा विनोदी चेहरा जोडायचा.
काही महिन्यांमध्येच त्याने फेसबुक पेज देखील सुरु केले. या पेजवर त्याने ट्विटरवरील काही ट्विट्स रिअपलोड केले तिथेही तो खूप व्हायरल झाला. तेथून तो प्रसिद्ध झाला.
थोड्याच दिवसांत त्याच्या पेजची फॅनफाॅलोविंग झपाट्याने वाढू लागली. दोन वर्षात त्याचे ट्वीटरवर ८ लाख तर फेसबुकवर ५ लाख फाॅलोवर्स झाले. काही दिवसांत प्रसिद्ध झालेले त्याची ही पेजेस फेसबुक,ट्वीटरने बंद करून टाकली आणि त्याचा हा प्रवास इथेच संपला.
त्याचे पेजेस फेसबुक आणि ट्वीटरने बंद केली मात्र त्याच्या कमेंट्स आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक लोक त्याच्या कमेंट्सचे स्कीन्सशाॅट्स घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. अनेक लोकांनी झेवियर किंवा ‘पकालु पपितो’ अशा त्याच्या नावाने अकांउट्स मीमर्स तयार केले आहेत. सध्या तेही खूप व्हायरल होत आहेत.
सध्या ट्वीटरवर ‘पकालु पपितो’ तसेच ‘idealist xavier’ नावाने दोन मोठे अकाउंट्स सुरु आहेत, ज्यांचे अडीच लाख आणि नऊ हजार फाॅलोवर्स आहेत. पण हे अकांउट नक्की पहिल्या ‘पकालु पपितो’ चे च आहेत का नाही हे स्पष्ट नाही.
कारण त्याच्या अकाउंट बॅन नंतर आता त्याच्या नावाने हजारो अकांउट्स बनलेले आहेत,आणि सगळेच जण टिप्पण्यांमधुन काहीतरी विनोदी कमेंट्स करत असतात, ज्या खुप वायरल होत आहेत.
दुसरा प्रश्न – ‘तो सर्व व्हिडिओ आणि पोस्ट अंतर्गत टिप्पणी का देतो?’
सध्या सोशल मीडियावर ‘पकालु पपितो’ आणि झेवियर नावाने अनेक अकॉउंट सोशल मीडियावर आहेत. पण प्रत्येक पोस्टच्या खाली उत्तर देणारा झेवियर हा वेगळाच असतो. विनोदी चेहऱ्यासह किंवा विनोदी फोटोसह कमेंट्स केल्याने लोकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.
उदाहरणार्थ..
अनेकजण ‘पकालु पपितो’ हा भारतीय वंशाचा नागरिक होता जो भारताबाहेर राहत होता अस म्हणतात.काहीजण म्हणतात तो मेक्सिकन होता. त्याच्या नावाने सध्या हजारो अकाउंट्स आहेत.
कदाचित तो त्यातीलच एक असेल किंवा कदाचित नसेलही. त्या प्रोफाईल फोटोवरील व्यक्ती कोण आहे हे सुद्धा अद्याप स्पष्ट नाही.काहीजणांच्या मते ती व्यक्ती सध्या आयआयटी कानपुरमधील स्टाफ मेंबर आहे.
तर काहीजण म्हणतात की ती व्यक्ती दक्षिण भारतामधील एक दुकानदार आहे.त्यामुळे प्रोफाईल फोटोतील व्यक्ती आणि पकालु पपितो या दोघांविषयी अजुनही ठोस माहिती उपलब्ध नाही.