World’s First SMS : जगामधील पहिला SMS कोणी, कधी आणि कोणाला पाठवला होता? जाणून घ्या काय होता तो SMS…

Published on -

World’s First SMS : तुम्ही आजकाल स्मार्टफोनमुळे त्वरित एकमेकांना SMS किंवा फोन करू शकता. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. आता सध्या डिजिटल युग सुरु आहे. त्यामुळे सध्या सोशल प्लॅटफॉर्म्सची क्रेझ सुरु आहे. पण तुम्हाला पहिल्या SMS चा इतिहास माहिती आहे का?

आजकाल कोणीही स्मार्टफोन चा शोध कसा लागला किंवा जगातील पहिला SMS कोणी कधी आणि कोणाला केला? याबद्दल कोणीही जाणून घेतले नसेल. तर आज तुम्हाला जगातली पहिला SMS कधी आणि कोणी केला होता याबद्दल सांगणार आहोत.

31 वर्षांपूर्वी 3 डिसेंबर 1992 रोजी लिहिलेला तो एक साधा पण आनंदी ‘मेरी ख्रिसमस’ होता हा SMS होता. 15 अक्षरे असणारा संदेश नील पापवर्थने व्होडाफोनच्या नेटवर्कद्वारे लिहिला होता आणि व्होडाफोन कर्मचारी रिचर्ड जार्विसने ख्रिसमस पार्टीच्या वेळी प्राप्त केला होता.

ब्रिटिश प्रोग्रामरने प्रथमच एसएमएस पाठवला

२२ वर्षीय ब्रिटीश प्रोग्रामर नील पापवर्थने संगणकावरून पहिला SMS पाठवला होता. डेलीमेलच्या मते, 2017 मध्ये नील पापवर्थ म्हणाले, ‘1992 मध्ये, मला कल्पना नव्हती की मजकूर पाठवणे इतके लोकप्रिय होईल आणि यामुळे लाखो लोक वापरत असलेल्या इमोजी आणि मेसेजिंग अॅप्सना जन्म देईल.’

जगातील पहिला SMS NFT म्हणून विकला गेला

जगातील पाहिला SMS विकला गेला होता. या SMS चा NFT म्हणून लिलाव करण्यात आला होता. डेली मेलच्या वृत्तानुसार, पॅरिसमधील अगुटच्या नागरिकाने प्रतिष्ठित मजकूर संदेशाचा लिलाव केला होता.

या संदेशाचा खरेदीदार हा मजकूर संदेशाच्या मूळ संप्रेषण प्रोटोकॉलच्या तपशीलवार आणि अद्वितीय प्रतिकृतीच्या वास्तविक मालकीचा एकमेव मालक आहे. खरेदीदाराने इथर क्रिप्टोकरन्सीद्वारे लिलावाचे पैसे दिले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe