Chanakya Niti : चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आचार्य चाणक्य यांनी मानवाच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. त्या धोरणांचा आजही मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. जीवनात प्रगती साधण्यासाठी चाणक्यांची काही धोरणे खूप महत्तवपूर्ण ठरत आहेत.
स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनाबद्दल आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच लग्न झाल्यानंतर मुलांना जन्म देणे हे महत्वाचे का आहे हेदेखील आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रथांत सांगितले आहे.
चाणक्य नीती या ग्रंथामध्ये पैसा, आरोग्य, व्यवसाय, वैवाहिक जीवन, समाज आणि जीवनातील यश, सुख-दु:खाशी संबंधित गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. त्याचा उपयोग जीवनात केला तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
प्रत्येक व्यक्तीचा जन्म जीवनात खास कोणत्या ना कोणत्या उद्देशाने झालेला असतो. जन्म हा एकदाच आहे त्यामुळे प्रत्येकाने मिळालेल्या जन्माचा फायदा केला पाहिजे. कोणतेही वाईट कृत्य न करता जीवन जगले पाहिजे.
आचार्य चाणक्य यांनी श्लोकांच्या माध्यमातून मानवी जीवनाची चार ध्येये सांगितली आहेत. ज्यांना ते पूर्ण करता येत नाही त्यांचे जीवन व्यर्थ जाते.
धर्मार्थकाममोक्षेषु यस्यैकोऽपि न विद्यते ।
जन्मजन्मनि मत्येष मरणं तस्य केवलम् ।।
1. धर्म
प्रत्येकाचा धर्म हा वेगवेगळा असतो. जन्म झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. जो व्यक्ती जीवनात धार्मिक कार्य करत असतो तो नेहमी यशस्वी होतो.
2. पैसा
आजकाल जीवन जगण्यासाठी पैसा हाच सर्वकाही झाला आहे. त्यामुळे जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हा खूप महत्वाचा आहे. पैशाशिवाय कोणत्याही गरज पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येकाला जीवनात पैसा कमावता आला पाहिजे.
3. काम
काम करत असताना प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार काम करणे गरजचे आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीने जीवनात आपली इच्छा पूर्ण केली पाहिजे. लग्न करून मुलं झाली पाहिजेत. कुटुंब आणि मुलांशिवाय मानवी जीवन निरर्थक आहे.
4. मोक्ष
आचार्य चाणक्य यांच्या मते मनुष्य जीवनात काही गोष्टी चुकीच्या करत असतो. त्यामुळे त्याला कर्मानुसार फळे मिळत असतात. जीवनात कर्म सर्वात महत्वाची गोष्ट आहे. चांगली कर्म करून मोक्ष मिळतो असे चाणक्य सांगतात.