महाराष्ट्रापाठोपाठ आता आणखी एक पक्ष फुटणार ? अक्षरशः खळबळ माजणार…

महाराष्ट्रापाठोपाठ आता बिहारमधील सत्तारूढ जदयूमध्ये उभी फूट पडणार असल्याचा दावा भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनी सोमवारी केला.

जदयूचे अनेक आमदार व खासदार आमच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री त्यांना एक मिनीटही वेळ देत नाहीत. त्यामुळे ते नाराज असून, कोणत्याही क्षणी जदयूची साथ सोडू शकतात, असे भकितही त्यांनी केले. दुसरीकडे सुशील मोदी यांचे दावे म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसिन सपने’ आहेत, असा पलटवार जदयूचे अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीवरून त्यांनी शरद पवारांचा बचाव केला. भाजपचे खासदार सुशील मोदी म्हणाले की, बिहारमध्ये बंडखोरीची स्थिती बनत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमारांनी मागील १७ वर्षांत कोणत्याही आमदार व खासदारांना वेळ दिला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर ते खासदारांना अवघा अर्धा तास देत आहेत.

तरीही जदयूत मोठी फूट पडणार आहे. अक्षरशः खळबळ माजणार आहे. अशावेळी कोणत्याही स्थितीत नितीशकुमारांना एनडीएमध्ये स्थान मिळणार नाही. अमित शाह यांनीही तसे ठणकावल्याचे सुशील मोदी यांनी स्पष्ट केले. जदयूच्या खासदारांना त्यांचे भवितव्य अंधकारमय वाटत आहे.

नितीश यांचे उत्तराधिकारी राजदचे नेते तेजस्वी यादव बनण्याची शक्यता आहे. जदयूचे राजदमध्ये विलीनीकरण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जदयूचे आमदार व खासदार अस्वस्थ आहेत. सध्या ते आमच्या संपर्कात आहेत. तसेच नितीशकुमारही घाबरले आहेत, असा दावा त्यांनी केला.

जदयूची व्होट बँक ढासळली आहे. त्यांचा जनाधार आमच्यासोबत आहे. नितीश- लालू आघाडीमुळे दोन्ही पक्षांत मतभेद वाढल्याचे सुशील मोदी म्हणाले. दुसरीकडे लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष पशुपती पारस यांनीही जदयूत फूट पडणार असल्याचे वक्तव्य केले.

पुतणे चिराग पासवान यांचा लौजप (रामविलास) हा आमच्या पक्षात विलीन व्हावा, असे भाजप श्रेष्ठींचे म्हणणे आहे. पण ते आम्हाला मान्य नाही. चिराग यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असा सल्ला पशुपती पारस यांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe