Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती ग्रंथामध्ये मानवी जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. तसेच स्त्रिया आणि पुरुषांच्या वैवाहिक तसेच इतर जीवनाबद्दल आचार्य चाणक्य यांनी काही तत्वे सांगितली आहेत. त्या तत्वांचा आजही तंतोतंत उपयोग मानवी जीवनात होत आहे.
मानवाला जीवनात यशस्वी होण्यासाठी चाणक्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब केल्यास तुम्ही जीवनात नक्की यश मिळवू शकाल. त्यामुळे चाणक्यांच्या धोरणांचे अनुसरण करणे फायद्याचे आहे.
अनेकदा असे दिसून येते की अनेक वेळा आपण अशा गोष्टी करतो ज्यामुळे नंतर आपले नुकसान होते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या दैनंदिन कामाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यापैकी एक म्हणजे अंघोळ करणे.
चाणक्याने सांगितले आहे की आपण कोणत्या वेळी स्नान करावे आणि कोणत्या वेळी करू नये. आचार्य चाणक्य यांनी सांगितले की अशी काही कामे आहेत जी करण्यापूर्वी आणि नंतर स्नान केले पाहिजे. तसे न केल्यास त्याचा परिणाम मानवासाठी अशुभ ठरू शकतो.
तैलभ्यंगे चिताधुमे मैथुन क्षोरकर्मणि ।
तवद् भवति चांडालो यवत स्नानम् न चाचेरेत् ।.
या श्लोकाचा अर्थ असा आहे की जोपर्यंत मनुष्य मालिश करून स्नान करीत नाही, अंत्यसंस्काराचा धूर अंगावर आला तरीही तो अंघोळ करत नाही. अनेक गोष्टी केल्यानंतर अनेक करणे गरजेचे आहे.
बॉडी ऑइल मसाज केल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे
मानवी शरीराला जास्त तेलाची गरज आहे. कारण तेल लावल्याने किंवा तेल लावून शरीराची मालिश केल्याने शरीर चमकदार बनते आणि ते निरोगो राहते. नेहमी शरीराची तेल लावून मालिश केल्यानंतर अंघोळ करावी. मालिश केल्यानंतर शरीरातील घाण बाहेर पडते त्यामुळे अंघोळ केल्यानंतर शरीर स्वच्छ होते.
अंत्यसंस्कार करून परत आल्यानंतर स्नान करणे आवश्यक आहे
तुम्ही अनेकवेळा अंत्यसंस्कार करून आल्यानंतर अंघोळ करणे टाळत असाल तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अंघोळ केल्याशिवाय घरत प्रवेश करू नये. जेव्हा अंत्यसंस्कारासाठी जातो तेव्हा तेथील जंतू शरीराला चिटकत असतात. त्यामुळे घरात अनेकजण आजारी पडू शकतात. त्यामुळे अंघोळ करणे गरजचे आहे.
स्त्री-पुरुष संबंधानंतर आंघोळ करा
प्रेमसंबंधानंतर स्त्री आणि पुरुष दोघांनीही स्नान केले पाहिजे. कारण त्यामुळे शरीर अशुद्ध होते, पवित्रता विरघळते. यानंतर कोणतेही पवित्र कार्य करता येणार नाही. त्यामुळे शरीराची शुद्धता राखण्यासाठी संभोगानंतर आंघोळ करावी.