Xiaomi 13 Pro Discount Offer : कमी किमतीत खरेदी करा ब्रँडेड स्मार्टफोन! शिओमी 13 Pro स्मार्टफोनवर मिळतेय हजारोंची सूट, जाणून घ्या ऑफर आणि किंमत

Ahmednagarlive24 office
Published:

Xiaomi 13 Pro Discount Offer : भारतामध्ये Xiaomi कंपनीने त्यांचा दमदार Xiaomi 13 Pro स्मार्टफोन वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. पण या स्मार्टफोनची बाजारातील किंमत खूपच जास्त आहे.

पण आता Xiaomi 13 Pro बंपर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन खूपच कमी किमतीमध्ये मिळत आहे. या स्मार्टफोनवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच इतर ऑफर देखील दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांचा चांगला फायदा होत आहे. कमी किमतीमध्ये ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी मिळत आहे.

भारतीय बाजारातील Xiaomi 13 Pro स्मार्टफोनची किंमत 79,999 रुपये आहे. पण Xiaomi फॅन फेस्टिव्हलमध्ये या स्मार्टफोनवर बंपर ऑफर मिळत. त्यामुळे कमी किमतीमध्ये हा स्मार्टफोन विकत घेऊ शकता.

Xiaomi 13 Pro वर बंपर ऑफर

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनवर बँक ऑफर देण्यात येत आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट EMI व्यवहारांवर Xiaomi 13 Pro च्या खरेदीवर 8,000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन या सूटमुळे 71,999 रुपयांना मिळत आहे.

तसेच इतकेच नाही तर या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. Amazon वर 33,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर या फोनवर दिली जात आहे. जर एखाद्या ग्राहकाने Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवरून हा फोन खरेदी केला, तर Redmi आणि Xiaomi स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट मिळेल.

जर तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर तुम्ही पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकता. त्यामुळे Xiaomi 13 Pro स्मार्टफोनवर तुम्हाला चांगली सूट मिळत आहे.

वैशिष्ट्ये

Xiaomi 13 Pro मध्ये 6.78-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,900 nits पीक ब्राइटनेससह येतो. हे स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.

फोनला चार्जिंग करण्यासाठी, कंपनीने 120W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,820mAh बॅटरी प्रदान केली आहे. फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनला 50MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्ससह 50MP प्राथमिक सेन्सर मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe