गौतम अदानींची दर दिवसाची कमाई ऐकून व्हाल थक्क

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- भारतीय उद्योगपती गौतम अदानींनी यंदा विक्रमी झेप घेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चीनचे सुप्रसिद्ध बाटलीबंद पाण्याचे उद्योजक झोंग शानशान यांना मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

गौतम अदानी आणि कुटुंबीयांनी गेल्या वर्षभरात दर दिवसाला तब्बल १,००२ कोटी रुपयांची कमाई केली असून एकूण संपत्ती ५ लाख ०५ हजार९०० कोटींच्या घरात पोहोचली आहे.

याआधीच्या वर्षात हा आकडा १ लाख ४० हजार २०० कोटी इतका होता. आशियातील सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी असले तरी गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत केवळ ९ टक्के वाढ झाली आहे.

तर गौतम अदानी यांच्या संपत्तीतील वाढ तब्बल २६१ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. आशियातील श्रीमंतांपैकी भारतीयांच्या यादीत यंदा पहिल्यांदाच टॉप-१० मध्ये गौतम अदानी

यांच्यासह त्यांचा दुबई स्थित भाऊ विनोद शांतिलाल अदानी यांचाही समावेश झाला आहे. गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. तर विनोद अदानी आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. विनोद अदानी यांची संपत्ती १,३१,६०० कोटी इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!