SRPF Daund Group Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप क्र. 5 दौंड पोलीस विभाग अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासंबंधित जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे.
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप क्र. 5 दौंड पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण 230 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे थेट सादर करायचा आहे. तसेच अर्ज देय तारखे अगोदर म्हणजेच 31 मार्च पर्यंत सादर करायचे आहेत. अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार असून, उमेदवार आपले अर्ज सादर करू शकतात.
![SRPF Daund Group Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/03/SRPF-Daund-Group-Bharti-2024.jpg)
वरील भरतीसाठी १२ वी पास उमेवार अर्ज सादर करू शकतात. अर्ज https://policerecruitment2024.mahait.org/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. लक्षात अर्जाची लिंक ५ मार्च पासून सुरु होईल आणि 31 मार्च रोजी बंद होईल तरी उमेदवारांनी देय तारखे गोदर अर्ज सादर करावेत.
वयोमर्यादा
वरील पदांसाठी वयोमर्यादा खुला वर्ग 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय 18 ते 33 वर्षे आहे.
अर्ज शुल्क
यासाठी अर्ज शुल्क देखील अनिवार्य आहे. खुला प्रवर्ग 450 /- रुपये, मागास प्रवर्ग 350 /- रुपये आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट www.mahapolice.gov.in ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने वर दिलेल्या लिंकद्वारे थेट सादर करायचा आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी. तसेच अर्ज 31 मार्च पर्यंत सादर करावेत. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
निवड प्रक्रिया
शारीरिक चाचणी,
लेखी परीक्षा,
चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
वैद्यकीय चाचणी इ.
भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी भरती जाहिरात सविस्तर वाचा.