ECHS Bharti 2024 : ECHS अहमदनगर अंतर्गत मिळणार 75 हजाराची नोकरी, बघा शैक्षणिक पात्रता

Content Team
Published:
ECHS Bharti 2024

ECHS Bharti 2024 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अहमदनगर अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. चला या संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊया…

वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, दंत स्वच्छता तज्ज्ञ/ सहाय्यक, चालक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, महिला परिचर, सफाईवाला” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन 30 जुलै 2024 रोजी करण्यात आले आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता असेल. त्यासाठी जाहिरात सविस्तर वाचावी.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

नोकरी ठिकाण

ही भरती अहमदनगर येथे होणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज OIC, Stn HQs (ECHS Cell) अहमदनगर या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 15 जुलै 2024 या तारखे पर्यंत सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 30 जुलै 2024 आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.echs.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

-लक्षात घ्या अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर अर्ज सादर करावेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe