AAI Recruitment 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 206 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा
AAI Recruitment 2025 Details
जाहिरात क्रमांक: DR-01/02/2025/WR

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | सीनियर असिस्टंट (official language) | 02 |
02. | सीनियर असिस्टंट (operations) | 04 |
03. | सिनिअर असिस्टंट (electronics) | 21 |
04. | सीनियर असिस्टंट (accounts) | 11 |
05. | जूनियर असिस्टंट (fire services) | 168 |
एकूण रिक्त जागा | 206 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- हिंदी / इंग्रजी पदव्युतर पदवी
- 02 वर्षांचा अनुभव
पद क्रमांक 02:
- पदवीधर
- हलके वाहन चालक परवाना
- 02 वर्ष अनुभव
पद क्रमांक 03:
- इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युकेशन / रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
पद क्रमांक 04:
- B.Com
- MS ऑफिसमध्ये संगणक साक्षरता चाचणी
- 02 वर्षे अनुभव
पद क्रमांक 05:
- मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / फायर डिप्लोमा किंवा
- बारावी उत्तीर्ण
- अवजड / मध्यम / हलके वाहन चालक परवाना
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 24 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोवा
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹1000/-
- एस सी / एस टी / ExSM / PWD /- महिला: यांना फी नाही
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.aai.aero/ |