AFMS Recruitment 2022 : भारतीय सैन्याने सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (AFMS) मध्ये 420 पदांच्या (post) भरतीसाठी नोटीस (Notice) जारी केली आहे. याअंतर्गत तुम्ही मेडिकल कॉर्प्समध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short Service Commission in the Medical Corps) मिळवून वैद्यकीय अधिकारी होऊ शकता.
अधिसूचनेनुसार, शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर्सच्या 420 रिक्त पदांपैकी, 378 रिक्त पदे पुरुषांसाठी आणि 42 महिलांसाठी आहेत. या भरतीचा भाग होण्यासाठी, तुम्हाला ऑनलाइन अर्ज (Online application) करावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2022 आहे. या रिक्त पदासाठी कोण अर्ज करू शकतो? यासाठी पात्रता काय असेल? जाणून घ्या या बातमीत.
किती पदांची भरती होणार?
अधिसूचनेनुसार, SSC वैद्यकीय अधिकाऱ्याच्या 420 पदांपैकी, 378 पदे पुरुषांसाठी आणि 42 पदे महिलांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. AFMS अंतर्गत भरती झाल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना लष्कर, हवाई दल किंवा नौदलात नियुक्त केले जाऊ शकते. शॉर्ट सव्र्हिस कमिशनमध्ये वैद्यकीय अधिकारी झाल्यानंतर त्यांची नियुक्ती देशात किंवा देशाबाहेरही होऊ शकते.
कोणती पदवी आवश्यक असेल?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात एमबीबीएस उत्तीर्ण केलेले असावे. त्यांची इंटर्नशिप देखील 31 ऑगस्ट 2022 पूर्वी पूर्ण झाली पाहिजे.
याशिवाय, उमेदवारांची वैद्यकीय पात्रता राष्ट्रीय वैद्यकीय परिषद कायदा, 2019 मध्ये समाविष्ट असली पाहिजे आणि कोणत्याही राज्य वैद्यकीय परिषद, राष्ट्रीय वैद्यकीय परिषद (NMC) किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) मध्ये कायमस्वरूपी नोंदणी असणे आवश्यक आहे.
निवड कशी होईल?
मुलाखत, शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अर्जदारांना मुलाखतीसाठी कॉल लेटर पाठवले जातील.
ही मुलाखत 27 सप्टेंबर रोजी आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅंट येथे होणार आहे. या मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक आणि वैद्यकीय मानक चाचणीसाठी बोलावले जाईल. निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र पाठवले जाईल.
अर्ज कसा करायचा?
या पदांसाठी अर्ज करण्याचे कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्यासाठी सशस्त्र दल वैद्यकीय सेवा www.amcsscentry.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.